आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षसंवर्धन:गाडगे महाराज आश्रमशाळेत वृक्षसंवर्धनासाठी अनोखा संदेश

धारणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ढाकारमल येथील कर्मयोगी संत गाडगे महाराज आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांकडून वृक्षाना सृष्टीबंध बांधून स्वस्थ पर्यावरणाचा अनोखा संदेश देण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गाडगे महाराज मिशन मुंबईचे खजीनदार तथा कर्मयोगी संत गाडगे महाराज आदिवासी प्राथमिक, माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालय तथा निवासी आश्रम शाळेचे संचालक ज्ञानदेव महाकाळ पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष महेंद्रसिंह गैलवार, प्राचार्य संजय लायदे, युथ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, पाराशर बुलबुले, सुलेमान मेमन, शकील अहमद, तस्मीन शेख, पोलिस पाटील बाबूलाल जांबेकर, झनकलाल चिलाटे, सुनील धांडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कर्मयोगी गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या वेळी राष्ट्रवंदना, सामूहिक गीत-गायन झाले.

बातम्या आणखी आहेत...