आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कत्तल केलेल्या वृक्षांसाठी घेतली शोकसभा:वृक्षतोड राेखण्यासाठी दर्यापूर शहरात पर्यावरणप्रेमींकडून अनोखे आंदोलन ; प्रतिकात्मक तेरवी भोजन

दर्यापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वनविभागाच्या संबंधित कर्मचाऱ्याने प्रत्यक्षात शंभर ते दीडशे वर्षं असलेल्या कडूनिंब झाडांचे वय लपवून २३ ते ४७ वर्षे दाखवत नगरपालिका व प्रशासनातील विविध विभागाची प्रचंड मोठी फसवणूक केली. या फसवणुकीमुळे बसस्थानक चौक ते जुनी नगरपालिका मार्गावरील तीन पुरातन (वारसा) वृक्षांची बेकायदेशीर कत्तल २९ ऑकटोबरला करण्यात आली.

त्यामुळे जलवृक्ष चळवळीचे संकल्पक विजय विल्हेकर, वृक्षप्रेमी, विविध सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी संघटनांनी सत्याग्रहाच्या मार्गाने प्रखर विरोध केला होता. त्याचवेळी उर्वरित ३६ वारसा वृक्षांना कत्तली पासून या मंडळींनी वाचवले. दरम्यान, वृक्षांना पण संवेदना असतात. या आधारावर वारसा झाडांसाठी वृक्षांची शोकसभा व वृक्ष तेरवी भोजनाचे आयोजन गुरुवार (दि.१०) रोजी शहरातील वैद्य वाड्यासमोर करण्यात आले.

यावेळी जिवंत झाडांना खतपाणी देऊन वृक्ष संवर्धनही करण्यात आले. कत्तल केलेल्या झाडांची वृक्ष तेरवी भोजन या अभिनव संकल्पनेला दर्यापुरातील वृक्षप्रेमींनी प्रचंड प्रतिसाद दिला. यावेळी ८० ते ९० वर्षे वय असलेल्या अनेक ज्येष्ठांनी “आम्ही अगदी बालक होतो, तेव्हापासून ही झाडे‎ इतकीच मोठी होती. हे स्पष्टपणे लिहून‎ दिले. हजारो लोकांनी ही वारसा वृक्षं‎ कायम ठेवूनच विकास करण्यात यावा,‎ असे लेखी पत्रकाद्वारे सूचित केले. वृक्ष‎ शोकसभेला व वृक्ष तेरवी भोजनाला‎ पर्यावरण क्रांती संस्था अमरावतीचे अध्यक्ष‎ शिवमोहन उपाध्याय, ‘वार’ संस्थेचे‎ अध्यक्ष नीलेश कंचनपुरे, गोपालदास शर्मा‎ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या‎ रस्त्याच्या विकासासाठी कुणीही मागणी‎ केली नसताना या रस्त्यावरच्या समस्त‎ मालमत्ताधारक, सार्वजनिक वाचनालय,‎ प्रबोधन गीता मंडळ या संस्थांनी झाडं‎ कायम ठेवून विकास करावा, असा ठराव‎ घेणार असल्याची माहिती जल वृक्ष‎ चळवळीचे संकल्पक विजय विल्हेकर‎ यांनी याप्रसंगी दिली.

यावेळी बंडूभाऊ‎ शर्मा, शेखर पाटील, श्रीकांत उमाळे,‎ मनोज तायडे, रामदास चव्हाण, विनोद‎ बिजवे, अशोकसिंह ठाकुर, राजाभाऊ‎ मुरतकर, विजय लाजुरकर, गणेश‎ लाजूरकर, अनिल गवई, किशोर‎ बायस्कर, विठ्ठल मानकर, मनोज पाटील,‎ जनार्दन गावंडे, अशोक कोकाटे, मालिनी‎ पाटील, नम्रता शहा, वर्षा अग्रवाल, सुनीता‎ मंडवे, प्रा.संगिता पुंडे, सिंधू विल्हेकर,‎ अनिरुद्ध वानखडे आदींनी उपस्थिती‎ लावून आपले वृक्षाबाबतचे मनोगत‎ मांडले. या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्तम‎ प्रतिसाद दिला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...