आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:देशसेवा करून परतलेल्या मेजरचे जंगी स्वागत

नांदगाव खंडेश्वर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नांदगाव खंडेश्वरवासीयांनी काढली सैनिकाची मिरवणूक; ठिकठिकाणी झाले स्वागत

शहरातील जवान भारत मातेची १७ वर्ष सेवा करून निवृत्तीनंतर घरी परतला असता, वर्ग मित्रपरिवार आणि क्रीडा संकुल विद्यार्थी मित्र परिवाराच्या वतीने त्याचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी त्याला एक प्रतिमाही भेट देण्यात आली. या प्रसंगी त्याची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. वातावरण भावनिक झाले होते.

आशिष वैद्य असे भारतीय सैन्यातून निवृत्त झालेल्या या सैनिकाचे नाव आहे. मित्र परिवारासह नागरिकांनी वैद्य यांचे स्वागत करून मिरवणूकदेखील काढली. त्यामध्ये देशभक्तीपर गीते वाजवून ढोल ताशांच्या गजरात बसस्थानक परिसर दणाणून सोडला होता. या वेळी नांदगाव खंडेश्वर पोलिस स्टेशनचे ठाणेदार हेमंत ठाकरे यांनी पुष्पगुच्छ व हाराने वैद्य यांचे स्वागत केले. शहरात ठिकठिकाणी व समाजातील प्रत्येक घटकाने त्यांचे मिरवणुकीदरम्यान स्वागत केले.

लहानपणापासूनच देशसेवेची आवड असलेल्या वैद्य यांनी या प्रसंगी भारतीय सैन्यात सेवा बजावताना आलेले अनुभव कथन केले. त्यांचे अनुभव ऐकून उपस्थित स्तब्ध झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप मसराम यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप डोफे यांनी केले. या प्रसंगी मनोज बनारसे, उमेश चौकडे, माधुरी चौकडे यांनी मनोगत व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...