आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टीग्रस्तांना अजूनही नुकसान भरपाई नाही:तहसीलसमोर 26 नोव्हेंबरपासून ठिय्या आंदोलनाचा इशारा, 25 पर्यंतचा दिला अल्टीमेटम

अमरावती15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोर्शी तालुक्यातील सावरखेड (पिंगळाई) येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे न मिळाल्याबाबतचे निवेदन मोर्शीचे तहसीलदार निलेश टारपे यांना देण्यात आले. 25 नोव्हेंबरच्या आत मदत न मिळाल्यास 26 नोव्हेंबरपासून तहसीलसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सरपंच ललिता जोमदे यांनी प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व केले. यावेळी विजय साबळे, राहुल निचित, महादेव भुंबर, रमेश खोडे, सुरेंद्र काळबांडे यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते. मौजा सावरखेडमध्ये अतिवृष्टीची नुकसान भरपाई 60 टक्के शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे 25 नोव्हेंबरच्या आत सर्व शेतकऱ्यांचे पैसे जमा करण्यात यावे अन्यथा सर्व शेतकरी 26 नोव्हेंबरपासून तहसील कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला.

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान

जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीने कहर केला. अनेक हेक्टरवरील पिकांची हानी झाली. पूरपरीस्थितीमुळे जमीन खरडून गेली. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या अन्यथा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू अस सांगितले आहे.

कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विलंब

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी त्यांचे अद्यावत बँक खातेक्रमांक असणे आवश्यक आहे. त्यासाठीची जबाबदारी नेहमी तलाठ्यामार्फत पूर्ण केली जायची. तेच लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या बँकांना पाठवायचे. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात त्याला मंजूर झालेली रक्कम जमा व्हायची. यावेळी तलाठ्यांनी या कामावर बहिष्कार घातला होता. त्यामुळे कृषिसेवक व ग्रामसेवक यांची मदत घेण्याचे धोरण स्वीकारण्यात आले. परंतु त्यांनीही पुढे सहकार्य केले नाही. त्यामुळे शिरखेड, सावरखेडसारखे अनेक गावांतील शेतकरी त्या-त्या तालुक्याच्या तहसीलदारांना विचारणा करीत आहेत.

सर्व लाभार्थ्यांना रक्कम मिळेल

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा आता राहिला नाही. बहुतेक कामे तलाठ्यांनीच पूर्ण केली आहेत. तरीही काही गावात पैसे न पोहोचल्याच्या तक्रारी आहेत. मी स्वत: त्यामध्ये लक्ष घालून हा मुद्दा निस्तारतो.

- विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...