आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:धामोडी येथे युवा शेतकऱ्याची  गळफास लावून आत्महत्या

दर्यापूर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील धामोडी येथील युवा शेतकऱ्याने शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. गौतम सुभाष डोंगरे (२४, रा. धामोडी) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. गौरवकडे एक एकर शेती आहे. मात्र कुटुंबाला आर्थिक सहाय्य व्हावे, म्हणून त्याने लागवडीने शेत केले होते. त्या शेतात हरभरा पिकाची लागवड केली.

या शेतात रात्रीच्या वेळी रानडुकरे पीक फस्त करत असल्यामुळे गौतम शेतावर रखवालदारीसाठी सोमवारी रात्रीच्या वेळी घरून गेला होता. सकाळी तो घरी लवकर परतला नसल्याने त्याच्या वडिलांनी शेतात जाऊन पाहिले असता गौतमने झाडाला गळफास लावल्याचे दिसून आले. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. मृतकाच्या पश्चात आई-वडील व दोन भाऊ असा आप्त परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...