आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास:जळगाव येथे गळफास लावून युवा शेतकऱ्याची आत्महत्या

धामणगाव रेल्वेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जळगाव येथे एका युवा शेतकऱ्याने कर्जाच्या वाढत्या डोंगराच्या विवंचनेतून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. २) रात्री उशीरा समोर आली. हिमांशू उर्फ भूषण मनोज चौधरी (२२) असे आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे.

हिमांशू चौधरी यांच्याकडे दोन एकर शेती आहे. पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले.डोक्यावरील कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांचे मोठे भाऊ अमर चौधरी यांनी दिली. दरम्यान घटनेच्या वेळी घरी कुणीही नसताना त्यांनी आपल्या खोलीत गळफास लावून मृत्यूला जवळ केले. उत्तरीय तपासणीअंती त्यांच्यावर जळगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. त्यांच्या पश्चात आईवडील, भाऊ आहे.

बातम्या आणखी आहेत...