आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास‎:निमखेड बाजार येथे युवा‎ शेतकऱ्याने घेतला गळफास‎

अंजनगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुर्जी‎ अंजनगाव पोलिस स्टेशन अंतर्गत‎ निमखेड बाजार येथील राहुल संजय‎ खडसे या २२ वर्षीय‎ तरुण शेतकऱ्याने‎ गळफास घेऊन‎ आत्महत्या केली.‎ ‎ ही घटना आज,‎ मंगळवार, ३‎ जानेवारी रोजी‎ सकाळी उघडकीस‎ आली.‎ राहुल खडसे हे खिराडा येथील‎ शेतात काम करून कुटुंबाचा‎ उदरनिर्वाह चालवत होते. परंतु सततची‎ नापिकी व अतिवृष्टीमुळे झालेल्या‎ नुकसानमुळे त्याच्या नावावरील‎ खाजगी कर्ज बोजा वाढला होता, अशी‎ चर्चा आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या‎ माहितीनुसार राहुल खडसे हे सोमवार,‎ २ जानेवारीला रात्री घरी परतले नाही.‎ त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी‎ कुटुंबातील सदस्य व काही नागरिक‎ आज, ३ जानेवारीला सकाळी‎ घराबाहेर पडले. दरम्यान खिराडा‎ येथील शेतशिवार रस्तावर असलेल्या‎ शेतात निंबाच्या झाडाला मशीनच्या‎ केबलने गळफास घेतलेल्या अवस्थेत‎ ते दिसून आले. त्यांच्या पश्चात आई,‎ वडील, एक भाऊ, एक बहीण असे‎ कुटूंब आहे.‎ राहुल खडसे‎

बातम्या आणखी आहेत...