आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सततच्या घटनांमुळे महिला असुरक्षित:तरुणाने भररस्त्यात तरुणीला केला बॅड टच ;16 तासात शहरात विनयभंगाचे चार गुन्हे दाखल

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात अलीकडे विनयभंगाच्या घटना सातत्याने घडत आहे. रविवारी (दि. २) रात्री ९ वाजेपासून ते सोमवारी (दि. ३) दुपारी १ वाजेपर्यंत या सोळा तासांत शहरातील चार पोलिस ठाण्यात विनयभंगाचे चार गुन्हे दाखल झाले आहेत. यातील एका प्रकरणात तर एका अनोळखी तरुणाने रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणीला नको त्या ठिकाणी स्पर्श करुन ‘बॅड टच’ केला आहे.

राजापेठ उड्डाणपुलाखालून पायी जाणाऱ्या एका तरुणीला एका सायकलस्वार २७ वर्षीय तरुणाने बॅड टच केला. या प्रकाराने तरुणी घाबरली व समोर चालत राहीली, हा पुन्हा गेला व त्याने पुन्हा तरुणीला स्पर्श केला. हा प्रकार १ ऑक्टोबरला घडला होता.

या प्रकरणी तरुणीने सोमवारी (दि. ३) दुपारी राजापेठ पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्या अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका मुलीला करण रमेश मुरलीय हा मागील सहा महिन्यांपासून फाेनद्वारे त्रास देत होता. त्यामुळे मुलीने त्याला समजावले व फोन करुन त्रास देवू नकाेस, असे सांगितले. त्यावेळी करणने मुलीच्या कॉलेजमध्ये जावून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना २ ऑक्टोबरला घडली.

या प्रकरणी सोमवारी (दि. ३) तक्रारीवरुन पोलिसांनी करण मुरलीयविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका कापड दुकानात काम करणाऱ्या तरुणीला मो. शहजाज ऊर्फ राजा हा मागील काही दिवसांपासून त्रास देतो आहे तसेच दुकानात तिला धक्के मारतो.

तसेच तरुणीसोबत वारंवार बोलण्याचा प्रयत्न करतो. मुलीने मोबाइल क्रमांक देण्यास नकार दिला तर त्याने तिला धमकावले. तसेच १ ऑक्टोबरला दुपारी त्याने मुलीसोबत वाद घातला आणि त्याच दिवशी सायंकाळी पुन्हा धमकावले. अखेर मुलीने २ ऑक्टोबरला कोतवाली पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.

तक्रारीवरुन पोलिसांनी मोहम्मद शहजाज ऊर्फ राजाविरुद्ध २ ऑक्टोबरला रात्री सव्वानऊ वाजता विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच नागपूरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका विवाहीतेला अन्वर अहेमद इप्तेकार अहेमद (४०) याने त्रास दिला आहे. तीच्यावर वारंवार वाईट नजर टाकून छेडले, अशा तक्रारीवरुन नागपूरी गेट पोलिसांनी २ ऑक्टोबरला रात्री नऊ वाजता त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...