आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकोळ वाद:ढाणकीत भर रस्त्यावर‎ युवकाला मारहाण‎

ढाणकी‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

किरकोळ वादाचे रूपांतर बाचाबाची‎ होवून ढाणकीत एका युवकाला‎ काही जणांनी मिळून मारहाण केली.‎ ही घटना मंगळवार, दि. ३ जानेवारी‎ रोजी सकाळी साडेअकरा‎ वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी‎ पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या‎ आहेत, परंतू गुन्हे दाखल‎ झालेल्यांची नावे पोलिसांनी जाहीर‎ केली नाही. ह्या घटनेनंतर दक्षता‎ म्हणून शहरात दंगल नियंत्रण पथक‎ दाखल झाले आहे. शहरातील‎ संवेदनशील ठिकाणी पोलिस‎ फौजफाटा तैनात ठेवला.‎ या घटनेचे सविस्तर वृत्त असे‎ की, घटनेच्या दिवशी फिर्यादी युवक‎ काही खासगी कामानिमित्त जून्या‎ बसस्थानकाकडे जात होता.‎

तेवढ्यात त्याला पशुवैद्यकीय‎ रूग्णालयानजीक मुख्य रस्त्यावर‎ अडवून शहरातील एका युवकाने‎ जुन्या कारणाहून त्याच्यासोबत‎ बाचाबाची केली. बाचाबाचीचे‎ रूपांतर हाणामारीत झाली. दोघांमध्ये‎ चांगलीच फ्रि-स्टाईल हाणामारी‎ झाली. यातील एका युवकाने‎ घटनास्थळावरून पळ काढत‎ स्वत:चा बचाव केला. या घटनेची‎ माहिती उपस्थितांनी‎ भ्रमणध्वनीवरून पोलिसांना दिली.‎

बातम्या आणखी आहेत...