आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाचा खून:चांदूर बाजार येथे चाकूने भोसकून तरुणाचा खून

अमरावती4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांदूर बाजार शहरातील सराफा लाइनमध्ये आपसी वादातून एका व्यावसायिक तरुणाचा चाकूने भोसकून खुन करण्यात आला आहे. ही घटना गुरूवारी (दि. २४) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान घटनेनंतर मारेकरी पसार झाला होता. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

चंदन नेमीचंद डिठोर (३६, रा. चांदूर बाजार) असे मृतक तरुणाचे तर सागर शेवतकर असे मारेकऱ्याचे नाव आहे. शहरातील सराफा लाइनमध्ये चंदन यांचे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान तर सागरचा पाणीपुरीचा व्यवसाय आहे.

चंदन व सागर यांच्यात दुपारी वाद झाला होता. सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास चंदन डिठोर हे त्यांचे दुकान बंद करत असताना सागर शेवतकर (४४) याने डिठोर यांच्यावर चाकूने वार केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. यावेळी काही उपस्थितांनी गंभीर अवस्थेत चंदन डिठोर यांना चांदूर बाजार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळावरून सागर शेवतकर हा पसार झाला होता. दरम्यान, त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...