आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएमम:आधारच्या सहाय्याने पोस्टमनमार्फत पैसे देण्याची योजना; रांगेत उभे राहण्याची नाही गरज

अमरावती8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला पैशांची गरज आहे. तुमच्या बँक खात्यात रक्कमही आहे, मात्र बँकेत किंवा एटीएमवर जाऊन पैसे काढणे काही कारणास्तव तुम्हाला शक्य नाही. अशावेळी तुम्हाला कोणतेही पोस्टमन पैसे देऊ शकतील. यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करणे आवश्यक आहे. कारण आधार क्रमांकाच्याच आधारे पोस्टमन तुम्हाला पैसे देणार आहेत. पोस्टमनने रक्कम दिल्यानंतर तेवढी रक्कम तुमच्या बँक खात्यातून कमी होईल.

टपाल कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. त्यापैकी एक योजना म्हणजे ‘एईपीएस’ (आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टिम) ही आहे. या योजनेत तुम्ही कोणत्याही जिल्ह्याचे रहिवासी आहेत आणि तुम्हाला इतरही जिल्ह्यात आर्थिक अडचण आल्यास पोस्टमन मदत करू शकतात. पोस्टमनला रक्कम मागितल्यानंतर पोस्टमन तुमचा आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक तसेच अंगठ्याचा ठसा घेणार आहे, त्याच आधारे तुम्हाला रक्कम देईल. शंभर ते दहा हजार रुपयांपर्यंत तुम्हाला या योजनेतून रक्कम घेता येणार आहे. ही सुविधा एखाद्यावेळी आपल्याला प्रवासात अडचण आली तरीही घेता येईल, तसेच कोणत्याही शहरात किंवा गावात पोस्टमन आपल्याला मिळेल, त्या ठिकाणी सेवेचा लाभ घेता येणार आहे.

प्रवासादरम्यान अडचण आल्यासही सुविधा : प्रवासात बाहेरगावी गेल्यानंतर पाकीट मारले गेले तर अशावेळी नवीन ठिकाणी कोण मदत करणार, असा प्रसंग निर्माण झाल्यास ही सुविधा अति महत्त्वाची ठरू शकणार आहे. कारण त्या शहरात पोस्टमन किंवा पोस्ट ऑफिस निश्चितच राहते, अशावेळी आपण पोस्टातून किंवा पोस्टमनच्या माध्यमातून आपल्या गरजेऐवढी रक्कम घेऊ शकतो.

आम्ही पोस्टमनकडे ठराविक रक्कम देऊनच ठेवतो
एईपीएस’ योजनेद्वारे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी आमची यंत्रणा तत्पर आहे. पोस्टमनला आम्ही रोज बाहेर निघण्यापूर्वी ठराविक रक्कम देऊनच ठेवतो. ज्यांना रक्कम हवी आहे, त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक गरजेचे आहे. ही सुविधा सर्वत्र उपलब्ध आहे.- नरेंद्र गिरपुंजे, वरिष्ठ पोस्ट मास्तर, अमरावती.

अडचणींच्या वेळी ठरणारही सुविधा फायद्याची
ही योजना शहर व ग्रामीण या दोन्ही ठिकाणी फायद्याची आहेच. मात्र शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात ही योजना अधिक महत्त्वाची ठरू शकते. कारण ग्रामीण भागात एटीएमची संख्या कमी आहे. तसेच प्रत्येक गावात बँकसुद्धा नाहीत, अशावेळी पोस्टमनकडून अडचणींच्या वेळी तत्काळ पैसे मिळू शकतात.

बातम्या आणखी आहेत...