आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्णतः चाप:जिल्ह्यात 89 हजार 367 ‘ मनरेगा’‎ मजुरांचे आधार कार्ड लिंकिंग बाकी‎

अमरावती‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी‎ योजनेअंतर्गत कामातील मोबाइल‎ अॅपवरून मजुरांची हजेरी नोंदणी‎ बंधनकारक केल्यानंतर आता‎ मजुरांची जॉबकार्ड आधार‎ कार्डशी जोडली जात आहे.‎ अद्यापपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ६७‎ हजार ९९३ अॅक्टिव्ह मजूर आहे.‎ यापैकी ३ लाख ४७ हजार १४५‎ मजुरांचे जॉबकार्ड व आधार लिंक‎ झाले आहे. यांची टक्केवारी ही‎ ७५ टक्के इतकी आहे. तसेच ८९ ‎ ‎ हजार ३६७ एवढ्या मजुरांचा‎ आधार लिंकिंग बाकी आहे. याची ‎ ‎ टक्केवारी २५ टक्के आहे. त्यामुळे ‎ ‎ रोजगार हमी योजनेतील बोगस ‎ ‎ प्रकाराला पूर्णतः चाप बसणार‎ आहे. परिणामी खऱ्या मजुरांना ‎ ‎ नियमित कामे मिळेल.‎ मग्रारोहयो कामावर काम‎ करणाऱ्या मजुरांना ऑनलाइन‎ पद्धतीने मजुरी दिली जाते.‎

७५ टक्के आधार सिडिंग‎ मग्रारोहयो मजुरांचे जॉबकार्ड‎ आधार कार्ड लिंक केले जात आहे.‎ आतापर्यंत ७५ टक्के आधार‎ सिडिंग झाले आहे. उर्वरित प्रक्रिया‎ सुद्धा पूर्ण करण्यासाठी सुटीच्या‎ दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्याचे‎ निर्देश संबंधितांना दिले आहेत.‎ - प्रवीण सिन्नारे, उपमुख्य‎ कार्यकारी अधिकारी, रोहयो‎

बातम्या आणखी आहेत...