आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका:आम आदमी पार्टीची महापालिका निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू

अमरावती7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात किरण नगर व बेनोडा प्रभागातील बैठकींना मिळालेल्या प्रतिसादानंतर आम आदमी पार्टी आणखी सक्रीय झाली असून शेगाव-रहाटगाव आणि नवोदय विद्यालय प्रभागात बैठक घेण्यात आली. दरम्यान यापुढे प्रत्येक प्रभागात बैठक घेण्याचे ठरविण्यात आले आहे. आगामी दोन ते तीन महिन्यात होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून ‘आप’ने प्रभागांमध्ये बैठकी घेण्याचा सपाटा लावला आहे.

शेगाव रहाटगावचे प्रभाग प्रभारी सागर बानुबाकोडे यांच्या विशेष प्रयत्नाने व रामपुरी कॅम्प झोन प्रभारी डॉ. पंकज कावरे व सुभाष गोहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी अनेक नवीन कार्यकर्ते पक्षात सहभागी झाले. दरम्यान याच बैठकीमध्ये रेखाताई हजारे यांच्या खांद्यावर महानगरच्या महिला संघटनमंत्री तर महानगर सचिव तथा रामपुरी कॅम्पचे झोन प्रभारी डॉ. पंकज कावरे आणि सहसंयोजक तथा रामपुरी कॅम्प झोनचे प्रभारी म्हणून सुभाष गोहत्रे यांची निवड करण्यात आली.

बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी आम आदमी पार्टीचे पश्चिम विदर्भ संघटनमंत्री तसेच मनपाचे निवडणूक प्रभारी नितीन गवळी यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला महानगर संयोजक डॉ. रोशन अर्डक, संघटनमंत्री माजी प्राचार्य अनिल राऊत, महिला संयोजिका विद्याताई सांगळुदकर, सहसंयोजक प्रवीण काकड, वसंत पाटील, युवा संयोजक नागेश लोणारे, नवोदय प्रभागाचे प्रभारी गोपाल तराळे तसेच विजय उमाळे, संतोष खंडारे, पारतवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...