आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापाालिका निवडणुकीची तयारी:आम आदमी पक्षातर्फे प्रभागांमध्ये बैठका घेण्याचा सपाटा, नवीन पदाधिकाऱ्यांच्याही नियुक्त्या

अमरावती15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
आम आदमी पार्टीच्या बैठकीला उपस्थित असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते. - Divya Marathi
आम आदमी पार्टीच्या बैठकीला उपस्थित असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते.

आगामी दोन ते तीन महिन्यांत होणाऱ्या महापालिकानिवडणुका डोळ्यापुढे ठेवून आम आदमी पक्षाने प्रभागांमध्ये बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. आज आपतर्फे शेगाव-रहाटगाव आणि नवोदय विद्यालय प्रभागात बैठक घेण्यात आली. यापुडे प्रत्येक प्रभागात बैठक घेण्याचा निर्णय आपतर्फे घेण्यात आला आहे. गेल्याच आठवड्यात किरण नगर व बेनोडा प्रभागात बैठक घेण्यात आली होती.

पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

शेगाव रहाटगावचे प्रभाग प्रभारी सागर बानुबाकोडे यांच्या प्रयत्नाने व रामपुरी कॅम्प झोन प्रभारी डॉ. पंकज कावरे व सुभाष गोहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आपची बैठक घेण्यात आली. यावेळी अनेक नवीन कार्यकर्ते पक्षात सहभागी झाले. याच बैठकीमध्ये रेखाताई हजारे यांच्या खांद्यावर महानगरच्या महिला संघटनमंत्री तर महानगर सचिव तथा रामपुरी कॅम्पचे झोन प्रभारी डॉ. पंकज कावरे आणि सहसंयोजक तथा रामपुरी कॅम्प झोनचे प्रभारी म्हणून सुभाष गोहत्रे यांची निवड करण्यात आली. बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी आम आदमी पार्टीचे पश्चिम विदर्भ संघटनमंत्री तसेच मनपाचे निवडणूक प्रभारी नितीन गवळी यांनी मार्गदर्शन केले.

बैठकीला महानगर संयोजक डॉ. रोशन अर्डक, संघटनमंत्री माजी प्राचार्य अनिल राऊत, महिला संयोजिका विद्याताई सांगळुदकर, सहसंयोजक प्रवीण काकड, वसंत पाटील, युवा संयोजक नागेश लोणारे, नवोदय प्रभागाचे प्रभारी गोपाल तराळे तसेच विजय उमाळे, संतोष खंडारे, पारतवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...