आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा‎:अ.भा. आंतर विद्यापीठ शरीरसौष्ठव‎ स्पर्धेसाठी विद्यापीठ संघाची घोषणा‎

अमरावती‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येनेपोया डीम्ड युनिव्हर्सिटी,‎ डेरालाकट्टे, मंगलोर (कर्नाटक)‎ येथे २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान‎ होणाऱ्या अखिल भारतीय आंतर‎ विद्यापीठ शरीरसौष्ठव (पुरुष)‎ स्पर्धेसाठी संत गाडगे बाबा‎ अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित‎ झाला असून खेळाडूंचे प्रशिक्षण‎ शिबिर विद्यापीठातील स्पोर्टस‎ कॉम्प्लेक्स मध्ये ७ ते १६ फेब्रुवारी या‎ कालावधीत होणार आहे.‎

खेळाडूंमध्ये कला व वाणिज्य‎ महाविद्यालय, येवदाचा शुभम‎ चिलात्रे, जी.एन.ए. महाविद्यालय,‎ बार्शी टाकळीचा कमलेश घावट,‎ श्री धाबेकर कला महाविद्यालय,‎ खडकीचा करण रामपिसे, श्रीमती‎ सालुकाबाई राऊत महाविद्यालय,‎ वनोजाचा पंकज मुरई, मातोश्री‎ सुभद्राबाई पाटील महाविद्यालय,‎ मानोराचा प्रणव चिस्तलकर,‎ जी.एस. टोंपे महाविद्यालय,‎ चांदुबाजारचा हर्षल यावले, श्री‎ शिवाजी शारीरिक शिक्षण‎ महाविद्यालय, अमरावतीचा प्रसाद‎ थोटे, सिपना अभियांत्रिकी‎ महाविद्यालय, अमरावतीचा कार्तिक‎ पिंपळकर व विठ्ठल रुख्मिणी‎ महाविद्यालय, सावनाचा आलोक‎ डेरे याचा समावेश आहे. सर्व‎ खेळाडूंनी प्रशिक्षण शिबिराला‎ उपस्थित रहावे, असे आवाहन‎ क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे‎ संचालक यांनी कळवले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...