आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्दुल सत्तारांना फडणवीसांचा धाक?:म्हणाले- शेतकऱ्यांना आम्ही खूप मदत करणार आहोत, पण घोषणा बाहेर करता येत नाही

अमरावती20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परस्पर घोषणा करण्यावरून यापूर्वी सत्तारांना देवेंद्र फडणवीसांनी फटकारले होते.

सध्या कांद्याला अत्यल्प भाव मिळत असून शेतकऱ्यांची भावना मला कळू शकते, असे वक्तव्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. याशिवाय कोथिंबीरीच्या हमीभावाबाबतही भाष्य केले. कधी मंदी येते कधी चांगला दरही मिळतो. भविष्यात ज्या ज्या ठिकाणी मागणी येईल तिथे कांदा खरेदी केली जाईल. नाफेडद्वारे आतापर्यंत 28 हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केला आहे. अजूनही कांदा खरेदी करू असे सत्तार म्हणाले. अमरावतीमध्ये माध्यमांशी ते बोलत होते.

घोषणा बाहेर करता येत नाही

सहा महिन्यात या सरकारने जेवढे पैसे शेतकऱ्यांना दिले ते याआधी कोणत्याही सरकारने दिले नसल्याचेही ते म्हणाले.अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात देण्यात आली. उरलेले 28 हजार शेतकऱ्यांना लवकरच पैसे मिळतील असेही सत्तार यांनी सांगितले. शेतकऱ्यांना खूप मदत आम्ही करणार आहोत. फक्त घोषणा बाहेर करता येत नाही. लवकरच शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार असल्याचे सत्तारांनी सांगितले. परस्पर घोषणा करण्यावरून यापूर्वी सत्तारांना देवेंद्र फडणवीसांनी फटकारल्यानंतर आता कोणतीही घोषणा करण्यापूर्वी सत्तार सावध पवित्रा घेतल्याचे पहायला मिळत आहे.

सरकार मार्ग काढण्याच्या तयारीत
राज्यात कांदा प्रश्नावरुन वातावरण तापले आहे. कांदा दराच्या मुद्यावरुन सभागृहातही विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. तसेच विविध ठिकाणचे शेतकरीही आक्रमक झाले आहेत. अशातच आता यावर राज्य सरकार मार्ग काढण्याच्या तयारीत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याला पुढच्या आठवड्यात राज्य सरकार दिलासा देण्याची शक्यता आहे. कांद्याला प्रती क्विंटल 200 रुपये द्यायचे की 500 रुपयाचे अनुदान द्यायचे यावर चर्चा सुरु आहे.

कांद्याची खरेदी सुरु
विधीमंडळ अधिवेशनात कांदा प्रश्नावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडच्या माध्यमातून तीन कंपन्यांमार्फत कांदा खरेदी सुरु करण्यात आल्याचे सांगितले आहे. बाजार समितीमध्ये लवकरच कांदा खरेदी केंद्रे सुरु करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले होते. सध्या महाकिसान वृद्धी अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडकडून कांद्याची खरेदी केली जात आहे.

संबंधित वृत्त

फडणवीसांनी अब्दुल सत्तारांना झापले:कोणताही निर्णय परस्पर जाहीर करू नका, योजनेची माहिती फोडल्याबद्दल विचारला जाब

राज्य सरकारच्या काही महत्त्वाच्या निर्णयांबाबत परस्पर जाहीर वक्तव्य केल्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस संतापले.तसेच, यापुढे कोणताही निर्णय परस्पर जाहीर करू नका, अशी सक्त ताकीद फडणवीसांनी अब्दुल सत्तार यांच्यासह उतावीळ मंत्र्यांना दिली.वाचा सविस्तर वृत्त

बातम्या आणखी आहेत...