आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:ऑफलाइन परीक्षेच्या मागणीसाठी ‘अभाविप’ ची विद्यापीठावर धडक, कुलगुरुंच्या दालनाबाहेर दिला ठिय्या; संघटनेच्या शिष्टमंडळातर्फे निवेदन सादर

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे विद्यापीठाने ऑनलाइन शिक्षण आणि परीक्षा घेण्यात आल्या. मात्र, आता परिस्थिती सामान्य झाली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या येणाऱ्या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात, या मागणीला घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर पोहोचले. मुख्य प्रवेशद्वार ते कुलगुरू यांचे कार्यालय असलेले प्रशासकीय इमारतीपर्यंत मोर्चा काढला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने कुलगुरूंना मागणीचे निवेदन दिले.

कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात टाळेबंदी लावण्यात आली. त्यामुळे या काळात विद्यापीठाने शिक्षणासह परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घेतल्या. मात्र, सद्याची परिस्थिती बघता सर्व वातावरण पूर्वीप्रमाणे झाले आहे. शैक्षणिक दृष्टीने विचार केला तर या दरम्यान अकॅडमिक कॅलेंडर खूप मागे आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर परीक्षेसंदर्भात गोंधळ व संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनात मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. तसेच विद्यापीठाद्वारे वारंवार वेगवेगळे परिपत्रक जाहीर करण्यात येत असल्याचे ‘एबीव्हीपी’चे म्हणणे आहे. विद्यापीठामार्फत ठोस निर्णय घेण्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यापीठाने उन्हाळी २०२२ च्या परीक्षेबाबत आपली भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करावी. तसेच परीक्षेचे वेळापत्रक सुद्धा त्वरित जाहीर करावे.

अकॅडमिक कॅलेंडर व इतर बाबींचा विचार करता विद्यापीठाने वेळापत्रक, परीक्षा, मूल्यमापन व निकाल या सर्व प्रक्रियेवर गांभीर्याने लक्ष देऊन नियोजन करावे. तसेच शैक्षणिक गुणवत्तेचा विचार करता परीक्षा या ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, यासारख्या मागण्यांसाठी निवेदन दिले. यावेळी विदर्भ प्रदेश मंत्री अखिलेश भारतीय, महानगर मंत्री चिन्मय भागवत सह विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...