आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा‎ दाखल:रंग लावण्याच्या बहाण्याने‎ अल्पवयीन मुलीवर अत्याचार‎

अमरावती‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत शिक्षणासाठी एक‎ अल्पवयीन मुलगी तिच्या भाड्याने केलेल्या‎ खोलीत राहत होती. त्यावेळी २० वर्षीय तरुण‎ खोलीत आला व तुला रंग लावू का, असे‎ मुलीला त्याने विचारले. तिने नकार देवून ती‎ चिडली. त्यावेळी त्याने जबरीने मुलीवर‎ अत्याचार केला. ही घटना ७ मार्चला घडली‎ असून, मुलीच्या तक्रारीवरून गाडगेनगर‎ पोलिसांनी १० मार्चला तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल‎ केला आहे.‎ कार्तिक राजेन्द्र सगे (२०, रा. गाडगेनगर,‎ अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे‎ नाव आहे.

पीडित मुलगी ही गाडगेनगर भागात‎ मैत्रिणींसह भाड्याने राहते. होळी असल्यामुळे‎ पडीत मुलीच्या मैत्रिणी गावी गेल्या होत्या. तसेच‎ घर मालकसुद्धा घरी नव्हते. दरम्यान, ७ मार्चला‎ सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पडीत‎ मुलगी ही खोलीवर असताना कार्तिक सगे हा‎ खोलीवर आला व मुलीला म्हणाला, मला रंग‎ लावायचा आहे. मात्र, मुलीने त्याला नकार दिला‎ आणि ती चिडली. यावेळी त्याने खोलीचा‎ दरवाजा आतून बंद करुन मुलीवर अत्याचार‎ केला. या प्रकरणी पडीत मुलीने दिलेल्या‎ तक्रारीवरून पोलिसांनी कार्तिक गणेशविरुद्ध‎ बलात्कार तसेच पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल‎ केला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...