आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:लग्नाचे आमीष देवून तरुणीवर अत्याचार

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुरात राहणारा २२ वर्षीय तरुण दोन वर्षांपूर्वी अमरावतीत पोलिस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी आला होता. त्याची एका २२ वर्षीय तरुणीसोबत ओळख झाली. याच ओळखीनंतर तरुणाने वारंवार अत्याचार केला. तसेच आता तो लग्नासाठी नकार देत असल्याची तक्रार पीडितेने राजापेठ पोलिसात शुक्रवारी (दि. २) दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्या तरुणाला नागपुरातून शुक्रवारी उशिरा रात्री अटक केली.

साहील राजेंद्र चंदेल (२२, रा. मानेवाडा, बेसारोड, नागपूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. साहील हा पोलिस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी जानेवारी २०२१ मध्ये अमरावतीत आला होता. त्याचवेळी त्याची शहरातील एका २२ वर्षीय तरुणीसोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले व नंतर भेटीगाठी वाढल्या. दरम्यान, जून २०२१ मध्ये साहिलने शहरातील मुधोळकर पेठेत त्याच्या मित्राच्या खोलीवर नेऊन तरुणीवर पहिल्यांदा अत्याचार केला. त्यानंतर वारंवार साहील तरुणीवर त्याच खोलीवर नेऊन शारीरीक अत्याचार करत होता. दरम्यान, साहिलने लग्नाचे आमिष दिल्याचे तरुणीने पोलिस तक्रारीत नमूद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...