आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्म स्वीकारून:माणुसकीचा धर्म स्वीकारून गरजूंना दिला मदतीचा हात

शेंदुरजनाघाटएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरात घरातील सर्वच साहित्य वाहून गेलेल्या २५० पुरग्रस्त कुटुंबीयांना स्थानिक करुणा बुद्ध विहार येथे नुकतेच संत्रा व्यापारी जावेदखान हस्तेखान यांच्या हस्ते जीवनपयोगी भांडी व साहित्याचे वितरण करून माणुसकीचा धर्म स्वीकारत मदतीचा हात देण्यात आला.

वरुड नगर परिषद क्षेत्रांर्तगत येत असलेल्या खडकपेंड, संविधान नगर (मिरची प्लॉट) परिसरात वास्तव्याला राहत असलेल्या कुटुंबियांचे काही दिवसांपुर्वी अतिवृष्टी दरम्यान शहरातील चुडामणी नदीला आलेल्या महापुरात सर्वच जीवनावश्यक वस्तुंसह संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. वाहून गेल्याने तब्बल २५० कुटुंबियांचे जनजीवन विस्कळीत झाले. या सर्व पुरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून पुणे येथील माणुसकी ट्रस्ट व वरुड त्रिरत्न बौद्ध महासंघ यांच्या संयुक्त सहकार्याने तब्बल २५० कुटुंबाना भांडी व जीवनावश्यक साहित्याचे नुकतेच वितरीत करण्यात आले. या जीवनावश्यक वस्तुंचे वितरण जावेद खान हस्ते खान पठाण यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पुणे धम्मचारी लोकमित्र, धम्मचारी विवेक मित्र यांच्या माणुसकी ट्रस्ट यांनी भरघोस मदत केल्यामुळे गरजूना मदत करता आल्याने त्यांचे या प्रसंगी विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

या उपक्रमाकरिता वरुड सेंटरचे चेअरमन धम्मचारी बोधीनंदन, धम्मचारी कुशलबोधी, धम्मचारिणी श्रध्दाश्री, अचलशिरी धम्ममित्र सी. एम. गजभिये, अरुण ब्राह्मणे, विनोद बागडे, संजय शंभरकर, नरेश रामटेके, मारोत धुताले, शोभा धुताले, रेखा बागडे, निर्मला लांडगे, राहुल गजभिये, ललिता गजभिये आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...