आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोर्शी नजीकच्या सालबर्डी येथुन कुरळी येथे आपल्या गावी परतत असताना जरुड येथे दुचाकी अनियंत्रित होऊन अपघात झाला. या घटनेत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याच वाहनावरील दुसरा प्रवासी गंभीर जखमी झाला. हा अपघात मोर्शी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर घडला.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनूसार, योगेश रमेश बुटरे (२२) असे या अपघातातील मृताचे नाव असून सुरज अरुण युवनाते (21, रा. कुरळी) असे जखमीचे नाव आहे. हे दुचाकी (क्र. एम. एच. 31, ए. जे. 7959 या दुचाकीने मोर्शी तालुक्यातील श्री क्षेत्र सालबर्डी येथे गेले होते. सोबत आणखी काही दुचाकीवीर मित्र होते. दरम्यान परतीच्या प्रवासावेळी कुरळी येथे आपल्या गावी पोहचत असताना जरुड येथील दत्त मंदिरासमोर दुचाकी अनियंत्रित होऊन राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षा कठड्यावर आदळून अपघात झाला. अपघात घडल्यानंतर नागरीकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस पोहचले. याचदरम्यान अपघातग्रस्तांना रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु, यात योगेशचा मृत्यू झाला.
जखमीला ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारार्थ नागपुरला पाठविण्यात आले. घटनेचा पंचनामा ठाणेदार प्रदीप चौगावकर यांचे मार्गदर्शनाखाली जरुड बीट जमादार सुनील आकोलकर, प्रशांत पोकळे यांनी केला असून पुढील चौकशी वरूड पोलिस करीत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.