आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानात ट्रक शिरून अपघात; चिमुकली ठार:अमरावतीच्या चिंचखेडमधील घटनेत दोघे गंभीर जखमी

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खाजगी पोल्ट्री फाॅर्मसाठी कुक्कुट खाद्यान्न घेवून परत जात असलेला ट्रक अचानक अनियंत्रित होवून रस्त्याच्या कडेने असलेल्या किराणा दुकानात शिरला. या अपघातामध्ये एका नऊ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला, तर एका महिलेसह 13 वर्षीय मुलगी अशा दोघी जणी गंभीर जखमी झाल्यात.

चिखलदरा तालुक्यातील चिंचखेडा येथे घडली. त्यांना उपचारार्थ अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमोली सुनील पंडूले (9) असे मृतक चिमुकलीचे, तर मयुरी योगेश वाघमारे (13) आणि पुर्णा गोसावी भार्वे (50) अशी जखमींची नावे आहेत. घटनेनंतर जमलेला संतप्त जमाव पाहून चालकाने ट्रक घअनास्थळावर सोडून पळ काढला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखलदरा तालुक्यातील चिंचखेडा येथे मोहन अजनेरिया, उमेश अजनेरिया आणि किशोर चव्हाण यांचा पोल्ट्री फॉर्म आहे. या पोल्ट्री फॉर्ममध्ये असलेल्या काेंबड्यांसाठी खाद्यान्न घेवून ट्रक (एमएच 41/ एजी 8163) आला होता. दरम्यान काेंबड्यांच्या खाद्यान्नाचा ट्रक खाली करून चालक परत जात असताना योगेश वाघमारे यांच्या किरणा दुकानासमोर ट्रकमध्ये बिघाड होवून तो अनियंत्रित झाला. हा अनियंत्रित ट्रक थेट वाघमारे यांच्या किराणा दुकानात शिरला. दरम्यान त्या वेळी दुकानासमोर मृतक अमोली, किराणा दुकानदार वाघमारे यांची मुलगी मयुरी व पुर्णा भार्वेे या उभ्या होत्या. अनियंत्रित ट्रकची या तिघींनाही धडक बसली. त्यामध्ये अमोलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर उर्वरित दोघीजणी गंभीर जखमी झाल्यात.

घटनेची माहिती मिळताच चिखलदराऱ्याचे ठाणेदार राहुल वाढिवे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय रुपनार, हे. कॉ. खंडारे यांनी लगेच घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून चिंचखेड्यात संतप्त जमावाची बैठक घेवून शांतता, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच गावखेड्यात आपापसामध्ये मैत्रीपुर्ण सामाजस्य कायम रहावा यासाठी प्रयत्न केला. घटनेचा पंचनाम उरकवून मृतक अमोलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखलदरा येथे पाठविण्यात आला. ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आला असून फरार ट्रक चालकाचा चिखलदरा पोलिस शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...