आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकौशल्या श्रृंगारे एज्युकेशन फाउंडेशन मुंबई द्वारा संचालित विद्यानिकेतन अंजनगाव येथे तीन वर्षांपासून फार्मसी डिप्लोमा सुरू असताना फार्मसी कौन्सिल ॲाफ इंडियाने नुकत्याच झालेल्या बैठकीत अंजनगाव सुर्जी येथील विद्यानिकेतन फार्मसी कॉलेजमध्ये फार्मसी डिग्री कॉलेज सुरू करण्यास परवानगी दिली आहे.संस्थेचे अध्यक्ष जे. मो. अभ्यंकर, सचिव प्रशांत अभ्यंकर यांच्या प्रयत्नाने अकोट, दर्यापूर, अचलपूर आणि अंजनगाव तालुक्यातील तसेच अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील अन्य ठिकाणच्या औषध शास्त्रात पदवी घेण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांना या परवानगीमुळे एक संधी लाभणार आहे.
विद्यानिकेतन संस्थेने औषधी शास्त्राच्या अध्ययनाकरिता लागणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण करून फार्मसी कौन्सिल ॲाफ इंडियाने निश्चित केलेल्या कठीण अटी व शर्तींची पूर्तता केली. अमरावती जिल्ह्यासह शेजारील अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.