आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात उन्हाचा कहर सुरू आहे. त्यामुळे तापमानाच्या दैनंदिन नोंदीला महत्त्व आले आहे. अमरावतीतील जलविज्ञान प्रकल्पात तापमान व त्यातील बदलांची नोंद करणारी यंत्रणा २४ तास कार्यरत आहे. तापमान हे उन्हावरून नव्हे, उष्ण वाऱ्याच्या झोताद्वारे ठरवले जाते.
बंदिस्त ‘स्टीव्हन्सन स्क्रीन’मध्ये नोंद झालेले तापमान आणि प्रत्यक्ष बाह्य वातावरणातील तापमानात फारशी तफावत नसते, अशी माहिती अमरावती येथील जलविज्ञान प्रकल्पामधील तज्ज्ञांनी दिली. छायाचित्र तसेच कंटेंट : अनुप गाडगे
दिवसातून दोन वेळा करतात तापमानाची नोंद
दिवसातून दोन वेळा तापमापकाचे प्रत्यक्ष वाचन केले जाते. किमान तापमान सकाळी ८.३० वाजता तर कमाल तापमान सायंकाळी ५:३० वाजता घेण्यात येते.
1. पहाटे ३:३० ते ५ या वेळात किमान तापमान राहते.
2. दुपारी २ ते ४ वेळेदरम्यान कमाल तापमानात वाढ होते.
3उष्ण वाऱ्याच्या झोताद्वारे निश्चिती
04 फूट उंची जमिनीपासून तापमापीची
1. वरच्या बाजूला आडव्या स्थितीतील तापमापक कमाल तापमान नोंदवते. 2. खालच्या बाजूला आडवे तापमापक किमानची नोंद घेते. 3-4. डाव्या- उजव्या बाजूला असलेले उभे तापमापक हे हवेतील आर्द्रता दर्शवण्याचे काम करते.
‘स्टीव्हन्सन स्क्रीन’मध्ये ४ तापमापी
दिवसभरातील तापमान मोजण्यासाठी तापमापक हे थेट सूर्यप्रकाश किंवा उघड्यावर ठेवले जात नाही. ते स्टीव्हन्सन स्क्रीन’मध्ये (झडप असलेली लाकडी पेटी) ठेवले जाते. वातावरणातील उष्ण वाऱ्याच्या तीव्रतेवरून ही नोंद केली जाते.
स्टीव्हन्सन स्क्रीन पेटीत मोजले जाते तापमान
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.