आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती:पोलीस कोठडीतच आरोपी तरुणाची आत्महत्या, अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा दाखल होता गुन्हा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने पोलीस कोठडीतच आत्महत्या केल्याने अमरावती शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यामध्ये सागर श्रीपत ठाकरे (वय 24,रा.खंबीत, ता. आष्टी, जि. वर्धा ) या तरुणावर अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल होता.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून सदर मुलीला परत आणले. त्यानंतर मुलीच्या तक्रारीवरून सागरवर बलात्काराच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यात फ्रेजरपुरा पोलिसांनी सागरला अटक केली. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात लॉकअपची व्यवस्था नसल्याने सागरला बुधवारी राजापेठ पोलीस ठाण्यातील लॉकअप मध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर गुरुवारी सकाळी ६ ते ७ च्या सुमारास सागरने आपल्या शर्टच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ७ च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.

शहर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर तसेच सीआयडीचे अधीक्षक अमोल गावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...