आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्राणघातक हल्ल्याप्रकरणी एका आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक ३) निखिल पी. मेहता यांच्या न्यायालयाने शुक्रवारी (दि. १) पाच वर्षे सश्रम कारावास, १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमतेतील ९ हजार रुपये जखमीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने यावेळी दिले. ही घटना १८ सप्टेंबर २०१७ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील खरैय्यानगर येथे घडली होती.
विधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश चंद्रशेखर नखाते (२८, रा. खरैय्यानगर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयात दाखल दोषारोपपत्रानुसार, सुमित सुरेश कोठारे रा.पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाची पुसदा येथे कारवाईहे घटनेच्या दिवशी म्हणजेच १८ सप्टेंबर २०१७ रोजी रात्री १० वाजता परिसरातील एका पानटपरी वरून पान खाऊन घरी जात होते. त्यावेळी मार्गात नीलेश नखाते याने त्यांना अडवले. पूर्ववैमनस्यातून त्यांच्यावर खंजीरने हल्ला चढवला. तर नीलेशचा साथीदार पंकज उर्फ टोकऱ्या गोकुल सीडाम यानेही सुमित वर चाकूने वार केले होते.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुमितला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या बयाणा वरून गाडगेनगर पोलिसांनी नीलेश व पंकज विरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासाअंती १४ डिसेंबर २०१७ रोजी आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात न्यायाधीश निखिल पी. मेहता यांच्या न्यायालयात पाच साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. न्यायालयात प्रकरण सुरू असताना आरोपी पंकज सीडामचा मृत्यू झाला.
या प्रकरणात साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी नीलेश नखाते याला ५ वर्षे सश्रम कारावास, १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील ९ हजार रुपये जखमी सुमित यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता मंगेश श्रीधर भागवत यांनी यशस्वी युक्तिवाद केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.