आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला ते मूर्तिजापूर महामार्गावरुन अटक:राजस्थानामध्ये पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला अटक

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेहबूब नगरमध्ये २७ जूनला अब्दुल मजीद यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात पोलिसांनी घटनेनंतर काही तासातच दोघांना अटक केली होती. मात्र, एक आरोपी पसार होता. तो राजस्थानमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असताना नागपुरी गेट पोलिसांनी ५ ऑगस्टला अकोला ते मूर्तिजापूर महामार्गावरुन अटक केली आहे.

शब्बीर शहा गुड्डु शहा (रा. मेहबूब नगर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी पोलिसांनी रियाज खान हफिज खान (रा. जामीया नगर) व फिरोज बाली जहीर बाली (रा. नुरनगर) या दोघांना अटक केली आहे. रईसा परवीन अब्दुल मजीद (४२, रा. मेहबूब नगर) यांनी तक्रार दिली होती की, २७ जूनला मध्यरात्री अब्दुल मजीद यांच्यावर रियाज खान हफिज खान, फिरोज बाली जहीर बाली व शब्बीर शहा गुडु शहा यांनी जुन्या वैमनस्यावरुन अश्लिल शिविगाळ करुन चाकुने हल्ला चढवून खून केला होता.

घटनेपासून यामधील शब्बीर शहा गुडु शहा हा पसार झाला होता. त्याचा पोलिस पथकाने संपूर्ण अमरावती, अचलपूर येथे शोध घेतला, परंतु तो मिwwळून आला नाही. अटक टाळण्याकरिता तो गावोगावी फिरत असल्याने त्याचा नेमका पत्ता पोलिसांना मिळत नव्हता. दरम्यान, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, शब्बीर शहा गुड्डु शहा हा अकोला जिल्हा येथे येत असून, त्यानंतर नेहमीसाठी राजस्थान येथे जात आहे, या खात्रीलायक माहितीवरून पोलिस पथक अकोला रवाना झाले. त्यानंतर शब्बीर शहाला अटक करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गजाआड झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...