आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:रस्त्याच्या कामाचे पूर्ण अंदाजपत्रक सादर न केल्यास कारवाई

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा क्षेत्रातील रस्त्यांच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करताना रस्त्याच्या कडेची नाली, पेव्हींग ब्लाॅक तसेच रस्ता रुंदीकरण या कामांचेही एकत्रित अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी सादर करावे. यापुढे असे अंदाजपत्रक सादर न झाल्यास संबंधिक अभियंत्यांना व्यक्तिश: जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा मनपा आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

मनपा क्षेत्रातील रस्त्यांच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करून मंजुरीच्या कामांसाठी सादर केले जातात. त्यांचे अवलोकन केल्यानंतर रस्त्याच्या कडेला पाणी वाहून नेणाऱ्या नाली, पेव्हींग ब्लाॅक व रस्ता रुंदीकरण कामाचा समावेश एकत्रितपणे अंदाजपत्रकात केला जात नाही. त्यामुळे हे रस्ते अत्यंत कमी कालावधीत नादुरुस्त होतात. त्यामुळे शासकीय निधीचा अपव्यय होतो. त्यामुळेच अंदाजपत्रकात रस्त्याच्या कामासह नाल्या, पेव्हींग ब्लाॅक व रस्ता रुंदीकरणाचा समावेश असावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...