आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण हटावची मोहीम:गुरूकुंजातील महामार्गालगत‎ अतिक्रमणावर धडक कारवाई‎

तिवसा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी‎ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरूकुंज मोझरी‎ येथील हायवेला लागून असलेल्या‎ अतिक्रमणावर कित्येक वर्षानंतर मंगळवारी‎ (दि. ११) कारवाईचा बुलडोजर चालला असून‎ येथील राष्ट्रीय महामार्गाने मोकळा श्वास‎ घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण‎ विभागाने अतिक्रमण हटावची मोहीम राबवली.‎ मात्र नुकसानाच्या भीतीपोटी अनेक‎ व्यावसायिकांनी आपापली दुकाने येथून‎ बुलडोझर चालण्यापूर्वीच रिकामी करून‎ गुंडाळली.‎ गुरूकुंज मोझरी गुरूदेवनगर येथे राष्ट्रीय‎ महामार्गालगत झालेल्या अतिक्रमणाने गेल्या‎ काही महिन्यांपूर्वी एका वैद्यकीय शिक्षण‎ घेणाऱ्या विद्यार्थ्याचा बळी घेतला होता.‎

याशिवाय हायवेलगतच्या दुकानात ट्रक घुसने,‎ छोटे-मोठे अपघात होणे सोबतच‎ येणाऱ्या-जाणाऱ्या दर्शनार्थी, विद्यार्थी व‎ नागरिकांना वाहनांपासून अपघाताची भीती‎ निर्माण झाली असताना येथील अतिक्रमण‎ हटवण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू‎ झाल्या होत्या.‎ येथील बेकायदेशीर अतिक्रमणाचे प्रकरण येथे‎ चांगलेच तापले होते. विविध राजकीय पक्ष,‎ संघटना व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने‎ अवैध अतिक्रमण हटविण्याची मागणी त्या वेळी‎ केली होती. त्यांनतरही राष्ट्रीय महामार्गालगत‎ अनेक अपघात झाले. या सर्व बाबीची दखल घेत‎ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने‎ बेकायदेशीर असणाऱ्या अतिक्रमणधारकांवर‎ कारवाई करत राष्ट्रीय महामार्गालगत असलेले‎ अतिक्रमण काढले. पोलिसांच्या चोख‎ बंदोबस्तात अतिक्रमण कारवाई केली.‎