आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गणपती विसर्जन आपल्या अंगणी’:चांदूर रेल्वे येथे राजे छत्रपती गणेश मंडळाचा उपक्रम; 'श्रीं'चे घरीच विसर्जन करण्याचे आवाहन

अमरावती23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजे छत्रपती गणेश मंडळातर्फे गणपती विसर्जन आपल्या अंगणी उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेला कृत्रिम तलाव. - Divya Marathi
राजे छत्रपती गणेश मंडळातर्फे गणपती विसर्जन आपल्या अंगणी उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेला कृत्रिम तलाव.

स्थानिक सरदार चौक, माळीपुरा परिसरात असलेले राजे छत्रपती गणेश मंडळ यांचा गणपती विसर्जन आपल्या अंगणी हा उपक्रम या वर्षीही राबविल्या जात आहे. गणपती विसर्जनाचा कृत्रिम हौद आपल्या अंगणात बोलावून विधिपूर्वक आपल्या घरातील गणपतीचे विसर्जन या हौदात संपुर्ण कुटुंबाच्या उपस्थितीत करता येते. मागील तीन वर्षांपासून मंडळाच्या वतीने गणपती विसर्जनासाठी थेट होम सर्व्हिस असा पर्यावरणपूरक स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे.

सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. गणेशोत्सवामध्ये तलाव, नदी, नाले, विहिरी यामध्ये विसर्जीत केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींमुळे जल प्रदुषणासह पाण्यात राहणाऱ्या जीवांची मोठी हानी होते. पीओपीच्या मुर्त्या पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होते. त्यासाठी बाप्पाचे विसर्जन हे विहीर, तलाव आणि पिण्याचे स्रोत असेल अशा जागी होवू नये, म्हणून मंडळाचे अध्यक्ष विवेक राऊत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम मागील तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. यासाठी मंडळाचे शुभम तायवाडे, चेतन चव्हाण, सुरज पवार, गणेश गायकवाड, अतुल मोरे, शुभम टेंभे, शुभम कोरडे, निखिल गायकवाड, शुभम पोद्दार, प्रतीक मालखेडे, चेतन कोरडे, धीरज चव्हाण आदी परिश्रम घेत आहेत.

काय आहे उपक्रम?

या उपक्रमामध्ये मंडळातर्फे एक कृत्रिम हौद तयार करून तो ट्रॅक्टरवर ठेवला जातो. ज्या घरून त्यांना फोन आला, त्या घरी तो ट्रॅक्टरवरील हौद नेलान जातो. त्यात संपूर्ण परिवारासह सुरक्षित व पर्यावरण पूरकरित्या गणपतीचे विसर्जन केल्या जाते. त्यानंतर पोलिस स्टेशन व शासनाच्या वतीने ठरवून दिलेल्या ठिकाणी हे गणपती विसर्जित केल्या जाते. त्यासाठी मंडळाद्वारे फोन नंबरदेखील देण्यात आला आहे.- विवेक राऊत, अध्यक्ष, राजे छत्रपती गणेश मंडळ

बातम्या आणखी आहेत...