आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शालेय शिक्षणाला स्पर्धा परीक्षा अभ्यासाची जोड

दर्यापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय जीवनापासूनच शिक्षणाला स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची जोड मिळावी यासाठी नुकतेच तालुक्यातील रामतीर्थ येथील शिवाजी हायस्कूलमध्ये या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष प्रा. गजानन भारसाकळे यांनी या उपक्रमाला मदत म्हणून सहा हजार रुपयांची पुस्तके शाळेचे मुख्याध्यापक एस. आर. वासनिक यांच्या सुपूर्द केलीत.

श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य तथा रामतीर्थ शाळेच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत काळमेघ यांनी मांडलेल्या संकल्पनेला कृतीद्वारे पूर्णत्वाकडे नेत असल्याबाबत रामतीर्थ येथील सरपंच तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रियंका मोटे यांनी शाळेचे अभिनंदन करून या उपक्रमास यथोचित मदत करण्याच्या आश्वासनासह शुभेच्छा दिल्यात. विद्यार्थ्यांना चाचणी परीक्षेद्वारे परंतु विनामूल्य या उपक्रमात प्रवेश दिला जाणार असून संपूर्ण नियोजनाची जबाबदारी अकोला जिल्ह्यातील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या बाभंळगाव येथील अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाच्या चमूने स्विकारली आहे. याबाबत रामतीर्थ येथील ग्रामस्थ तसेच शाळा समितीने या विद्यार्थी घडविणाऱ्या महत्त्वपूर्ण सेवेबाबत अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत थोरात व सर्व विषयांचे विभाग प्रमुख यांचे आभार व्यक्त केले. हा उपक्रम संपूर्ण वर्षभर सातत्याने राबविण्यात येणार असून वेळोवेळी स्पर्धा परीक्षेतील यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन इत्यादी बाबी वैशिष्ट पूर्ण ठरणार आहेत.

कार्यक्रमाला शालेय तथा परिसरातील विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एस. आर. वासनिक, सूत्रसंचलन प्रा. गजानन भारसाकळे, तर आभार प्रदर्शन राजेश ठोसर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी किशोर पाटील, राजेश गव्हाळे, कविता काळे, प्रा. दिनेश श्रीराव, संतोष सावळे व अशोक घाटे, तसेच अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने प्रा. डॉ. अमित गावंडे, आदित्य देशमुख यांनी अथक परीश्रम घेतले.

‘स्पर्धा परीक्षा स्वप्न साकार करण्याचे माध्यम’
स्पर्धा परीक्षा हे विद्यार्थ्याचे स्वप्न साकारून जीवनात आनंद फुलविणारे स्वाभिमानाचे माध्यम ठरते असे मार्मिक प्रतिपादन श्री शिवाजी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय बाभूळगाव, अकोला येथील मॅकेनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रा. डॉ. एस. के. पाटील यांनी रामतीर्थ येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रमाचे उद्घाटन समारंभांत प्रमुख वक्ते म्हणून प्रबोधनपर भाषणातून केले.

बातम्या आणखी आहेत...