आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्ण संख्या:तीन नव्या कोरोना बाधितांची भर, सक्रिय रुग्णांची संख्या 23 वर

अमरावती10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी दिवसभरात जिल्ह्यात तिघांना कोरोनाची बाधा झाली. २४ तासांतील या नव्या आकडेवारीमुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या थेट २३ वर पोहोचली असून त्यातील १५ जण ग्रामीण भागाचे तर उर्वरित ८ जण अमरावती महापालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत. दरम्यान कोरोनाची बाधा झालेल्या जिल्हाभरातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६ हजार १५ वर पोचली असून कोरोनातून बरे होऊन सुटी घेतलेल्यांची संख्या १ लाख ४ हजार ३६७ झाली आहे. यामध्ये बरे होऊन घरी गेलेल्या आजच्या पाच रुग्णांचाही समावेश आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५९३ नागरिकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. याशिवाय पर जिल्ह्यातून या ठिकाणी उपचार घेण्यासाठी पोचलेल्या ३२ जणांनाही कोरोनामुळे जीव गमवावा लागला.

बातम्या आणखी आहेत...