आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्त कार्यालय:आदिवासी फासेपारधी समाज संघटनेचा अधिकार मोर्चा ; विभागीय आयुक्त कार्यालयावर दिली धडक

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी फासेपारधी समाज संघटनेच्या वतीने बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांचा काळ लोटल्यावरही आदिवासी फासेपारधी, भटके-विमुक्त यांना अद्यापही घटनात्मक सोयीसुविधा मिळाल्या नाही. त्यांच्याकडे राजकीय नेते, शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत राहिले. त्यामुळे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी फासेपारधी समाज संघटनेच्या नेतृत्वात समाजबांधवांनी बुधवारी इर्विन चौक येथून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. भटके-विमुक्त, आदिवासी फासेपारधी कसत असलेल्या जमिनी त्यांच्या नावे करण्यात याव्या, घराखालील जागा नावाने करण्यात यावी, जागा नसलेल्यांना घरासाठी ती उपलब्ध करून देण्यात यावी, भटके, विमुक्त व फासेपारधी वस्त्यांना स्वतंत्र दर्जा देऊन महसूल दप्तरी नोंद करण्यात यावी, पारधी विकास आराखडा, त्यातील शिफारशी व विविध योजनांची अंमलबजावणी पारदर्शकपणे करण्यात यावी, सर्वांना नागरिकत्वाचे दाखले मिळण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात यावी, आदी मागण्यांकडे या मोर्चाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले. मोर्चात ॲड. डॉ. अरुण जाधव, बाबू सिंग पवार, संतोष पवार, सागर पवार, प्रमोद वालदे, सचिन घोसले, मनोज सोळंके, अभय पवार, संतोष जाधव, शानदास भोसले यांच्यासह अन्य समाजबांधव सहभागी झाले होते. विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन) ते विभागीय आयुक्त कार्यालयावर अधिकार मोर्चा काढला होता.

बातम्या आणखी आहेत...