आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासक राज:जिल्ह्यातील 256 ग्रामपंचायतीमध्ये लवकरच येणार प्रशासक राज

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील २५६ ग्रामपंचायतींमध्ये लवकरच सरपंच राज संपुष्टात येऊन प्रशासक राज सुर होणार आहे. तशी तयारी जिल्हा प्रशासनाने सुरु केली असून निर्धारित मुदतीत निवडणुका घेणे शक्य नसल्यामुळे प्रशासनावर ही वेळ ओढवणार आहे.११३ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये तर १४३ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपुष्टात येत आहे.

१९०८ सदस्यांचा कार्यकाळ संपणार
जिल्ह्यातील २५६ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात येण्यासोबतच तेथील सरपंच, उपसरपंचांसह १ हजार ९०८ ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळही संपुष्टात येणार आहे. त्यामुळे पुढील कार्यकाळात या ग्रामपंचायतींचे कामकाज ग्रामसेवकांच्या सहकार्याने त्याठिकाणी नेमण्यात येणाऱ्या प्रशासकांकरवी पुढे नेले जाईल, असे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...