आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘प्रशासक राज’:उद्यापासून जिल्ह्याचा कारभार येणार प्रशासकांच्या हातात!; सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाचा कार्यकाळ संपला

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • \

जिल्हा परिषद वगळता बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राजवट सुरु झाल्याने अख्खा जिल्हाच प्रशासकांच्या हातात आला आहे. दोन नगरपंचायती, नऊ नगर परिषदा आणि १० पंचायत समित्या अशा तब्बल २१ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राजवट डोकावली आहे. जिल्हा परिषदेच्या लोकनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ उद्या, २० मार्च, रविवारला संपुष्टात येत असल्याने सोमवार, २१ मार्चपासून तेथेही प्रशासक राज सुरु होईल. अशाप्रकारे सोमवारपासून अख्खा जिल्हाच प्रशासकांच्या हातात येणार आहे.

आजपासून थेट सव्वा वर्षांपूर्वी जिल्ह्यातील ४ नगर पंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आला. २१ नोव्हेंबर २०२० हा दिवस तिवसा, धारणी, भातकुली व नांदगाव खंडेश्वर या चार नगर पंचायतींच्या लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस होता. परंतु वेळेत निवडणुका नझाल्याने दुसऱ्या दिवसापासून तेथील सूत्रे प्रशासकांच्या (सीओ) हाती सोपवण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अलिकडच्या शृंखलेतील ही जिल्ह्यातील सर्ंवात पहिली प्रशासक राजवट होय. दरम्यानच्या काळात यापैकी तिवसा व भातकुलीची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्याने तेथील प्रशासक राज संपले. परंतु धारणी व नांदगाव खंडेश्वर येथील प्रशासक राजवट अजूनही सुरुच आहे.

नगरपंचायतीनंतर २७ डिसेंबर २०२१ रोजी नगरपंचायतीनंतर २७ डिसेंबर २०२१ रोजी जिल्ह्यातील ‘अ’ वर्ग नगरपालिका असलेल्या अचलपूरसह ‘ब’ वर्गातील अंजनगाव सुर्जी व वरुड आणि ‘क’ वर्गातील दर्यापूर, चांदूरबाजार, मोर्शी, शेंदुरजनाघाट, चांदूर रेल्वे आणि धामगणगाव रेल्वे या नऊ नगरपालिकांचा कार्यकाळ संपुष्टात आला. राज्य सरकार येथेही वेळेत निवडणुका घेऊ शकले नाही. त्यामुळे तेथील सूत्रेही प्रशासक अर्थात सीओंच्या (मुख्याधिकारी) हाती देण्यात आली. त्यानंतर अलिकडे १४ मार्चपासून जिल्ह्यातील १० पंचायत समित्यांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले असून, सोमवारपासून जिल्हा परिषदेची प्रशासकीय सूत्रेही सीईओंच्या हाती देण्याचे शासनाने ठरवले आहे. प्रशासकीय राजवट सुरु झालेल्या पंचायत समित्यांमध्ये चिखलदरा, चांदूरबाजार, मोर्शी, वरुड, अमरावती, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर व भातकुलीचा समावेश आहे. धारणी पंचायत समितीचा कार्यकाळ जून २०२२ मध्ये तर चिखलदरा नगरपालिकेचा कार्यकाळ डिसेंबर २०२२ मध्ये संपुष्टात येणार असल्याने तेथील लोकनियुक्त सरकार सध्या अबाधित आहे.

कुठे कुठे प्रशासक राजवट?
नगर पंचायती- धारणी, नांदगाव खंडेश्वर
नगरपालिका- अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरुड, दर्यापूर, चांदूरबाजार, मोर्शी, शेंदुरजनाघाट, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे
पंचायत समिती- चिखलदरा, चांदूरबाजार, मोर्शी, वरुड, अमरावती, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, भातकुली

येथे नाही प्रशासक राजवट
नगर पंचायती- तिवसा, भातकुली
नगरपालिका - चिखलदरा
पंचायत समिती- तिवसा, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, धारणी

हा कालखंड अगदी आचारसंहितेसारखा
प्रशासक राजवट म्हणजे अगदी निवडणुकीच्या आचारसंहितेसारखा कालखंड आहे. या काळात अधिकाऱ्यांवर फारशी बंधने नसतात. लोकप्रतिनिधींचा नेहमी असणारा ताणही संपुष्टात आलेला असतो. त्यामुळे बहुतेक अधिकारी या संधीचे सोने करु शकतात. प्रशासकीय कामकाजातील नेहमीच अडथळेच दूर झालेले असल्याने ते खऱ्या अर्थाने लोकाभिमुख कामे करु शकतात. गाव-शहरांच्या गरजेनुरूप निर्णय घेऊन ते अंमलात आणू शकतात. विदर्भात यापूर्वी काही अधिकारी लोकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. नागपूरचा कायापालट करणारे तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर आणि अमरावतीच्या सुधारणांवर भर देणारे चंद्रकांत गुडेवार (मनपा आयुक्त) यांच्या बदल्या रद्द करण्यासाठी त्यामुळेच लोकांनी स्वत:हून मोर्चे काढले होते.

बातम्या आणखी आहेत...