आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा वकील संघाची निवडणूक गुरुवारी (दि. ३१) पार पडली असून मतदानानंतर लगेच मतमोजणीला प्रारंभ झाला. गुरुवारी उशिरा रात्री निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी अॅड. शोएब खान, उपाध्यक्षपदी अॅड. जितेंद्र देशमुख, सचिवपदी अॅड. मुकेश देशमुख तर ग्रंथालय सचिव पदावर अॅड. श्रीकांत पांडे विजयी झाले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ॲड. शोएब खान यांनी बाजी मारली. त्यांना ४३५ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी ॲड. मिलिंद देशपांडे यांना ३६५ मते पडली. उपाध्यक्षपदासाठी तिहेरी लढत होती. त्यात ॲड. जितेंद्र देशमुख विजयी झाले. त्यांना ४५६ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी ॲड. योगेश सोनोने यांना १६९ व ॲड. अमित जामठीकर यांना १५४ मते पडलत. सचिवपदाच्या निवडणुकीत ॲड. मुकेश देशमुख यांनी बाजी मारली. त्यांना ४९४ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी ॲड. एन. डी. राऊत यांना २४३ मते पडलीत. ग्रंथालय सचिवपदी ॲड. श्रीकांत पांडे ५६९ मते घेऊन विजयी झाले.
प्रतिस्पर्धी ॲड. राहुल डाखोरे यांना १४४ मते मिळाली. तसेच कार्यकारी सदस्यपदासाठी झालेल्या निवडणुकीत ॲड. भूषण कोकाटे - ६०३ मते, ॲड. चेतन बुंदेले - ६०० मते, ॲड. सुमित शर्मा - ५६६ मते, ॲड. सुषमा रायबोले -५२४ मते, ॲड. संदीप वानखडे -४६३ मते, ॲड. कपिल गुप्त - ४५५ मते व ॲड. गौरव मुंदे - ४४७ मते हे उमेदवार विजयी झाले. ही निवडणूक प्रक्रिया मुख्य निवडणूक अधिकारी अॅड. उज्वल सोनोने यांच्या मार्गदर्शनात पार पडली आहे. याचवेळी अॅड. शहजाद नय्यर व अॅड. विनोद नागापूरे हे निवडणूक निर्णय अधिकारी तर अॅड. दिगांबर पाटील, अॅड. नीलेश जोशी, अॅड. धीरज वानखडे, अॅड. नरेश रोडगे, अॅड. शरद सुर्यवंशी आणि अॅड. पायल गाडे यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहीले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.