आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्त्वपूर्ण निर्णय:अॅड. संदनशिवे खून प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र जिल्ह्यातील वकील घेणार नाही

अमरावती14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील व्यंकय्यापूरा भागातील अॅड. सविता संदनशिवे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी नातेवाईकांना अटक केली आहे. या आरोपींचे जिल्ह्यातील कोणताही वकील वकीलपत्र घेणार नाही, असा निर्णय सोमवारी (दि. १२) जिल्हा वकील संघाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे.

अॅड. सविता संदनशिवे यांच्या पतीचे दिड वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यानंतर सविता या तीन मुलींना घेऊन सासरीच राहत होत्या. यावेळी त्यांना सासू, नणंद व अन्य नातेवाईक प्रचंड त्रास देत होते. यातूनच ८ सप्टेंबरला दुपारी त्यांच्या दोन अल्पवयीन नातेवाइकांसह नंनदेने, सासूने त्यांचा गळा दाबून व डोक्यात लोखंडी रॉड मारुन खून केला व आत्महत्येचा बनाव केला असल्याचे समोर आले होते. यामुळेच पोलिसांनी नणंद व सासूला अटक करुन दोन अल्पवयीनांना बाल सुरक्षा गृहात पाठवले आहे. दरम्यान, अमरावती जिल्हा वकील संघाने सोमवारी शोकसभा घेऊन अॅड. सविता संदनशिवे यांना श्रध्दांजली वाहिली तसेच त्यांच्या खून प्रकरणातील आरोपींचे कोणताही वकील वकीलपत्र घेणार नसल्याचा निर्णय घेतला. सोबतच सविता यांच्या मुलींना भविष्यात आर्थीक मदत करण्याबाबतही चर्चा झाली असल्याचे वकील संघाचे अध्यक्ष अॅड. शोएब खान यांनी सांगितले आहे. यावेळी सभेला जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने वकील मंडळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...