आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांगरणी:उत्पन्न वाढवण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय अंगीकारण्याचा शेतकऱ्यांना दिला सल्ला; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: केली ट्रॅक्टरने नांगरणी

अमरावती3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हसला येथील शेतकरी रवींद्र मेटकर यांच्या अंजनगाव बारी रस्त्यावरील मातोश्री फार्मला जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मिनी ट्रॅक्टर चालवून नांगरणीचा अनुभव घेतला. शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्नासाठी मेटकर यांच्यासारखेच शेतीपुरक व्यवसाय सुरु करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

२००८ मध्ये रवींद्र मेटकर यांनी बँकेकडून २५ लाख रुपयांचे कर्ज घेत कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरु केला. या व्यवसायामुळे सध्या ते दररोज ९० हजार अंडी विकतात. आजघडीला त्यांच्या पोल्ट्री फॉर्ममध्ये स्वयंचलित थ्रीटायर पद्धतीचे आठ शेड आहेत. त्यात दीड लाख पक्षी आहेत. त्यापासून वर्षभरात त्यांना दीड कोटी रुपये उत्पन्न मिळते. दुसरीकडे सात एकर जमीनीत संत्रा, मोसंबी, चिकू, आंबा, पेरू, फणस, विविध मसाले, नारळाचे उत्पन्नही घेतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या फार्मला भेट देऊन प्रयोगशीलता जाणून घेण्याचे ठरवले.

कुक्कुटपालनासाठी कोंबडीच्या जातीची निवड, शेडची रचना, पक्ष्यांची वाढ आणि त्यानुसार व्यवस्थापन, पक्ष्यांचे खाद्य, पक्ष्यांसाठी योग्य तापमान व्यवस्थापन बाबतची माहिती कौर यांनी घेतली. पशुसंवंर्धन उपायुक्त संजय कावरे, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके, तहसीलदार संतोष काकडे, प्रकल्प संचालक (आत्मा) अर्चना निस्ताने, पशुधन विकास अधिकारी डॉ. जयंत माहुरे आदी यावेळी उपस्थित होते.

मेटकर यांनी पटकावलेले पुरस्कार
रवींद्र मेटकर यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आदर्श शेतकरी पुरस्कार, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा नवसंशोधक पुरस्कार, राज्य शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे.

कृषी विभागाला प्रशिक्षणाचे निर्देश
कृषी विभागाने शेतकऱ्यांचा गट तयार करुन प्रशिक्षणाचे आयोजन करावे. कुक्कूटपालन, पशुपालन आदींबाबत माहिती द्यावी. कृषी क्षेत्रात उत्पादनवाढीसाठी जोड व्यवसायाबाबत प्रशिक्षण देणे महत्त्वाचे असल्याने कृषी विभागाने नियोजन करावे, असे निर्देश दिले

बातम्या आणखी आहेत...