आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • After 60 Hours It Will Be Known Whether Shivaji Is The Dominance Of Progress Or An Opportunity For Development; Voting Will Be Held On 11| Marathi News

निवडणुक:60 तासानंतर कळणार शिवाजी त प्रगतीचे वर्चस्व की विकासाला संधी; 11 रोजी होणार मतदान

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारी सर्वांत जुनी शिक्षण संस्था म्हणून लौकिक असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक अवघ्या ६० तासांवर येऊन ठेपली आहे. विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांचे प्रगती पॅनल तर उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वातील विकास पॅनल यापैकी सत्ता नेमकी कुणाच्या हाती लागणार, हे या निवडणुकीद्वारे ठरणार आहे.

निवडणूक कार्यालयातर्फे घोषित वेळापत्रकानुसार, शनिवार, १० सप्टेंबर रोजी पंचवटी चौकस्थित श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात दुपारी १ वाजता आमसभा सुरु होईल. ३ वाजेपर्यंत कामकाज चालल्यानंतर दुपारी साडेतीन ते साडेचार या वेळात कार्यकारी परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. त्यानंतर अर्ध्या तासाने छाननी करुन वैध नामांकनाची यादी घोषित केली जाईल. सायंकाळी ५ ते ६ या वेळात इच्छुकांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुभा असेल. पुढे सायंकाळी ६.३० वाजता उमेदवारांची अंतिम यादी घोषित केली जाईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० या वेळात मतदान होईल.

हर्षवर्धन देशमुख व नरेशचंद्र ठाकरे यांच्यात अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून एकमत न झाल्याने या निवडणुकीत दोन पॅनल समोरा-समोर उभे ठाकले आहेत. दरम्यान, दोन्ही पॅनलने आपापले उमेदवार घोषित केले असून, प्रचार कार्यही सुरु केले आहे. देशमुख व ठाकरे यांच्याशिवाय उपाध्यक्ष अॅड. गजानन पुंडकर व डॉ. रामचंद्र शेळके, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, केशवराव गावंडे, केशवराव मेटकर व अॅड. अशोक ठुसे, असे सध्याचे पदाधिकारी आहेत. यापैकी नरेश चंद्र ठाकरे व केशवराव मेटकर या दोन मावळत्या पदाधिकाऱ्यांना सोबत ठेवण्यात हर्षवर्धन देशमुख यांना यश आले नाही.

त्यामुळे त्यांनी इतर माजी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन विकास पॅनल तयार केले. उर्वरित सर्व पदाधिकारी हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वातील प्रगती पॅनलमध्ये आहेत. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी देशमुख यांनी पत्रकार परिषद आयोजित करुन त्यांच्या पॅनलची भूमिका स्पष्ट केली. यावेळी पॅनलचे सर्व उमेदवारही उपस्थित होते. दरम्यान निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संस्थेने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अकोल्याचे अॅड. बी. के. गांधी यांची नियुक्ती केली आहे तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून जितेंद्र देशमुख त्यांना मदत करतील.

असा आहे संस्थेचा व्याप
देशाचे प्रथम कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी डिसेंबर १९३२ मध्ये श्री. शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे. सध्य स्थितीत अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखेसह २४ वरिष्ठ महाविद्यालये, १५४ कनिष्ठ महाविद्यालये, ७५ माध्यमिक शाळा आणि ३५ वसतिगृहे असा या संस्थेचा व्याप आहे.
नरेशचंद्र ठाकरे

राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान
विस्ताराच्यादृष्टीने सातारा जिल्ह्यातील ‘रयत’नंतर राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेची ओळख आहे. अध्यक्ष, कोषाध्यक्ष, तीन उपाध्यक्ष आणि चार कार्यकारिणी सदस्य अशा नऊ पदांसाठी ही निवडणूक होत असून त्यादृष्टीने शिव परिवारातील वातावरण चांगलेच तापले आहे. शिवाजीच्या विद्यमान कार्यकारिणीचा कालावधी २१ सप्टेंबरला पूर्ण होत असल्याने तत्पूर्वीच निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
हर्षवर्धन देशमुख

बातम्या आणखी आहेत...