आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळ्यात दोर बांधून टाॅवरवर वीरुगिरी:लेखी आश्वासनानंतर भीमराव कुऱ्हाडे यांनी मागे घेतले आंदोलन

दर्यापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील करतखेड येथील पूर्णा नदीपात्राच्या हेलडोह घाटावर अवैधरीत्या रेतीचे उत्खनन केल्याप्रकरणी प्रशासनाने संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी लोतवाडा येथील भीमराव कुऱ्हाडे हे ६ डिसेंबरला दुपारनंतर दर्यापुरातील शिवररोडस्थित टाॅवरवर चढले. त्यांची ही वीरुगिरी २ तास सुरू होती. दरम्यान, लेखी आश्वासनानंतर कुऱ्हाडे यांनी माघार घेतली.

करतखेडा गावालगत पूर्णा नदीपात्रातून लिलावधारक अमीत काळकर रा. बुलडाणा, युवराज खेडकर रा. करतखेड यांनी करारनामा व अटी, शर्तीचे उल्लंघन करीत ९ जूननंतरही अवैधरीत्या रेतीचे उत्खनन केले. एवढेच नव्हे तर पुरावा नष्ट करण्याचे प्रयत्न केले, असा कुऱ्हाडे यांचा आरोप आहे. याबाबतची व्हिडीओ क्लिप त्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदींकडे पुरविली आहे. दरम्यान त्या आधारे चौकशी करुन सात दिवसात दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी होती. याच काळात या प्रकरणाची दखल घेत तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांनी मागील महिन्यात ८ लाख ७५ हजाराचा दंड आकारण्याचे आदेशही दिले होते. मात्र दोषीविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवून फौजदारी कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त तक्रारकर्ते भीमराव कुऱ्हाडे यांनी ा टॉवरवर चढून गळ्याला दोरी बांधून घेतली होती. तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करुन पुढील कारवाई करण्याचे लेखी पत्र दिले.

बातम्या आणखी आहेत...