आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळा दाबला, बलात्कार केला अन् दगडाने ठेचून मारले:धुऱ्यावर बैल चारण्याच्या वादाचा तरुणाने काढला वचपा; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धारणीपासून तब्बल 62 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात राहणाऱ्या 40 वर्षीय महिलेचा धुऱ्यावर बैल चारण्यावरुन 20 वर्षीय तरुणासोबत चार दिवसांपुर्वी वाद झाला होता. याच वादाचा वचपा काढण्यासाठी त्याने या महिलेला शेतात एकटे पाहून तीचा गळा दाबला, नंतर तीच्यावर बलात्कार केला आणि दगडाने ठेचून खून केला. ही धक्कादायक घटना गुरूवारी पहाटे 2 वाजताच्या सुमारास उघड झाली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हटकल्याने आला राग

चन्नू ऊर्फ सचिन शिवलाल दारसिंबे (20) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोळ्याच्या दिवशी चन्नू व महिलेचा बैल चारण्यावरुन वाद झाला होता. चन्नू हा महिलेच्या शेताच्या धुऱ्यावर बैल चारत असल्यामुळे महिलेने त्याला हटकले होते. यापुर्वीही त्यांच्यात वाद व्हायचे. दरम्यान बुधवारी (ता. 31) सकाळी सात वाजताच्या सुमारास ही महिला घरुन शेतात गेली मात्र सांयकाळ झाली तरीही घरी परत आली नाही. म्हणून कुटूंबियांनी तीची शोधाशोध सुरू केली.

नाल्याजवळ सापडला मृतदेह

दरम्यान सांयकाळी साडेसात वाजताच्या सुमारास शेताच्या धुऱ्याला लागून असलेल्या एका नाल्याजवळ महिलेचा मृतदेह आढळला. त्यामुळे गावात चांगलीच खळबळ उडाली. महिलेचा मृतदेह असल्याची प्राथमिक माहीती धारणी पोलिसांना नागरिकांकडून बुधवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास मिळाली. हे गाव धारणीपासून तब्बल 62 किलोमीटर असून घटनास्थळ गावापासून दोन किलोमीटर आतमध्ये होते. त्यामुळे पोलिसांना घटनास्थळावर जाईपर्यंत मध्यरात्रीचे दोन वाजले.

खुनापूर्वी महिलेवर अत्याचार

पोलिसांनी दोन वाजेपासून माहीती काढणे सुरू केले असता हा खून असून खुनापुर्वी महिलेवर बलात्कार झाल्याचे समोर येत होते. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ मृतदेह ताब्यात घेवून वैद्यकिय तज्ज्ञांकडून प्राथमिक मत घेतले. त्यावेळी बलात्कार झाल्याचेही समोर आले.

दरम्यान गुरूवारी सकाळीच संशयाच्या आधारे पोलिसांनी चन्नू दारसिंबेला ताब्यात घेवून चौकशी केली. त्याचा खूनप्रकरणात सहभाग निष्पन्न होताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सखोल तपास सुरू

''जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठीच अटक केलेल्या आरोपीने महिलेवर बलात्कार करुन खुन केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. या प्रकरणी सखोल तपास करण्यात येत आहे.''- अविनाश बारगळ, पोलिस अधिक्षक.

बातम्या आणखी आहेत...