आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • After Two And A Half Days In Amravati, The Counting Of Votes Of The University Continues, Only 1 Of The Remaining 5 Seats Has Been Announced, Nuta's Avinash Borde Has Won

अडीच दिवस उलटूनही विद्यापीठाची मतमोजणी सुरुच:उरलेल्या 5 पैकी फक्त 1 जागेचा निकाल घोषित, नुटाचे अविनाश बोर्डे विजयी

अमरावती9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती विद्यापीठाच्या सिनेटची मतमोजणी अडीच दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरही पूर्ण झाली नसून नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातील पाच जागांसाठीचा तिढा अद्याप कायम आहे. दरम्यान मतपत्रिकांवरील दुसरी, तिसरी, चौथी…. पसंती शोधण्याचे काम सुरु असतानाच कोटा पूर्ण झाल्यामुळ‌े नुटाचे अविनाश बोर्डे विजयी झाले आहेत. त्यामुळे सिनेटच्या निवडणुकीतील नुटाच्या विजयी उमेदवारांची संख्या एकने वाढून 26 झाली आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट व ‌अ‌ॅकडेमीक कौन्सिलसह अभ्यास मंडळांची निवडणूक रविवार, 20 नोव्हेंबरला पार पडली. त्यानंतर मंगळवार, 22 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरु करण्यात आली. सदर निवडणूक पसंतीक्रमावर आधारित असल्याने त्यात इव्हीएमचा वापर करता येत नाही. त्यामुळे या निवडणुकीत मतपत्रिका वापरण्यात आल्या.

या मतपत्रिका वेगवेगळ्या करुन त्यातील वैध, अवैध मते वेगळी करण्यातच पहिले चौदा तास खर्ची लागले. विद्यापीठ प्रशासनाने त्यासाठी चार वेगवेगळ्या चमू तयार करुन आठ टेबलांद्वारे हे काम पार पाडले. सुमारे दीडशेहून अधिक कर्मचारी वर्ग त्यासाठी व्यस्त झाला होता.

22 नोव्हेंबरला रात्री 11 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ झाला. त्यानुसार दुसऱ्या दिवशीच्या सायंकाळपर्यंत सिनेटच्या 36 पैकी 31 आणि अ‌ॅकडेमीकच्या सर्व, सहा अशा 37 जागांचे निकाल घोषित करण्यात आले. त्यात नुटाच्या वाट्याला 25, शिक्षण मंचच्या वाट्याला सात तर एका जागी अपक्ष उमेदवार विजयी झाला. दरम्यान उरलेल्या पाच जागांच्या निकालासाठी अद्यापही प्रतीक्षा करावी लागत आहे. काही कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडल्याने बुधवारी सायंकाळी मतमोजणी 12 तासांसाठी थांबविण्यात आली होती. ती आज, गुरुवारी सकाळी 8 वाजेपासून सुरु करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...