आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्नत्याग:महागाई, बेरोजगारीविरोधात वंचितचे गुरुवारी अन्नत्याग

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात वाढती महागाई आणि बेरोजगारी या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात गुरुवार, २८ जुलै रोजी एक दिवसीय अन्न त्याग व ठिय्या आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात येणार आहे. नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित महानगर प्रमुख आशिष लुल्ला यांनी पत्रपरिषदेतून केले आहे.

सद्या देशात वाढती महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. खाद्य पदार्थ, शालेय वस्तूंच्या किंमती वाढ, जीएसटी सारखी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तसेच दुसरीकडे बेरोजगारी वाढल्याने तरुणवर्ग नैराश्य, गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहे. त्यामुळे सामान्य जनता हैराण झाली आहे.

तसेच आरोग्य समस्या, आदी विषयांवर वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन उभे करत आहे. अमरावती शहराच्या वतीने गुरुवारी या विरोधात अन्न त्याग तसेच ठिय्या आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. पत्रपरिषदेत शहराध्यक्ष आशिष लुल्ला, विद्या वानखडे, पुष्पा बोरकर, प्रमोद राऊत उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...