आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेपिंगळाईत नागरिक आक्रमक:चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा केला निषेध; प्रतिमाही जाळली

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा नेरपिंगळाई येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामुहिकरित्या निषेध करण्यात आला. यावेळी त्यांच्या वक्तव्यावर टीका करणाऱ्या घोषणा देत त्यांची प्रतीमाही जाळण्यात आली.

सर्व नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येत आपला असंतोष व्यक्त केला. त्यानंतर वेगवेगळ्या घोषणा देत निषेध करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज हे कर्मविरांचे आदर्श होते. याच कालखंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेही कर्मविरांना मोठे सहकार्य लाभले. म्हणून ज्ञानाने समृद्ध असलेली पिढी कर्मवीर निर्माण करू शकले, या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेले विधान अत्यंत दुर्दैवी आहे. एका कार्यक्रमामध्ये त्यांनी हे अवमानकारक वक्तव्य केले होते.

बहुजन वर्गाच्या भावना दुखावल्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी “भिक मागून”शाळा चालविल्या अशा प्रकारचे बेताल वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे होते. अशाप्रकारे महापुरुषांची बदनामी करण्याची स्पर्धा सध्या भाजपाच्या नेत्यांनी चालवलेली आहे. या वक्तव्यामुळे संपूर्ण दलित आणि बहुजन वर्गाच्या भावना दुखावल्या असे म्हणत या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी पाटील यांच्या विरोधात तीव्र‎ नारेबाजीही करण्यात येऊन त्यांची प्रतिमा जाळण्यात आली.

यांची होती उपस्थिती

यावेळी अमोल नवले, रामदास भेले, रुपेश गणेश, अफसर पठाण, राहुल मंगळे, अक्षय पांडे, प्रकाश नवले, सुरज कुरसंगे, राजु गायकी, अंबादास राऊत, अंबादास पांडे, सिद्धार्थ यावले, सरपंच सविता खोडस्कर, मोहन देशमुख, सागर बानेवार, अन्सार कुरेशी, सतिश इंगळे, किशोर पाटील, करण तंवर, अभिजीत कांबळे, राज तायडे, शिवम पांडे, रवि राऊत, कुलदीप बावरी, रिझवान शहा, शुभम इंगळे व छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...