आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचा उपक्रम:नवाथे मल्टिप्लेक्सच्या पीएमसीसोबत करार; येत्या आठवड्यात काढणार निविदा

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम नवाथे मल्टिप्लेक्सच्या पीएमसीसोबत नुकताच करार झाला असून, येत्या आठवड्यात मल्टिप्लेक्ससाठी निविदा काढणार असल्याची माहिती रविवारी मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली आहे.नवाथे मल्टिप्लेक्स हा नवाथे चौकातील मनपाचा उपक्रम गेल्या १६ वर्षांपासून रखडला आहे. त्यात अडथळेच अडथळे असल्याने तो अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. आता मनपा आयुक्तांनी जातीने लक्ष घालून या प्रकरणी पीएमसीच्या नियुक्तीला मंजुरी दिली. पीएमसी नियुक्तही झाली. आता मल्टिप्लेक्साठी निविदा काढली जाणार असून, त्यानंतरच या उपक्रमाचे काम मार्गी लागणार आहे. निविदा प्रक्रियेत सुमारे दीड महिना जाणार आहे. त्यानंतरच या प्रक्रियेत कोणतेही अडथळे आले नाहीत तर काम पुढे सरकेल.

मनपाची स्वत:च्या मालकीची नवाथे येथे जमीन असून तेथे मल्टिप्लेक्स उभारले जावे, असा प्रस्ताव सुमारे १६ वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. त्यानंतर सभागृहात त्यावर साधक-बाधक चर्चाही झाली. मंजुरीनंतर पीएमसीची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर या उपक्रमाचे कंत्राट देण्यात आले. परंतु, नंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. त्यामुळे ते रखडले. आता मात्र पुन्हा या उपक्रमाचे काम सुरू होण्याची शक्यता बळावली आहे.

बातम्या आणखी आहेत...