आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषि कार्यक्रम:राजकीय कार्यक्रमात सहभागी कृषिमंत्र्यांची शेतकऱ्यांकडे पाठ

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजकीय कार्यक्रमात सहभागी झालेल्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली असून, ते बळीराजाचे कैवारी नाहीतच ,’ अशा शब्दात शिवसेनेच्या दाेन्ही जिल्हा प्रमुखांनी शनिवारी टीकास्त्र साेडले. कृषिमंत्री सत्तार यांनी शिवसेनेवर शुक्रवारच्या दाैऱ्यात टीका केली हाेती. यावर आता शिवसेनेेचे आमदार नितीन देशमुख व जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर प्रत्यत्तुर दिले आहे.

कृषिमंत्री सत्तार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली नसून, त्यापेक्षा त्यांना गद्दार असलेल्या शिंदे गटाचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम महत्त्वाचा वाटला, अशा शब्दात शिवसेनेने शिंदे-फडणवीस सरकाराचा समाचार घेतला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मध्यंतरीच्या काळात खताचाही प्रचंड तुटवडा होता. याबाबत कृषिमंत्री सत्तार यांनी दाैऱ्यात बैठक घेणे अपेक्षित होते. मात्र कृषिमंत्र्यांनी साधी बैठक घेतली नाही, असे शिवसेनेचेही म्हणणे आहे. जिल्ह्यात एक हजार ३०० कोटींच्या केवळ पाणी पुरवठा याेजना, जलसंधारणाची ७० कोटींचे कामे, रस्ते, सामाजिक न्याय भवनासह विकास कामांसाठी कोट्यवधी रुपये ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारने मंजूर केले होते. जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी-लोकप्रतिनिधींशी चर्चा करूनच मान्यता दिली. त्यामुळे लोकप्रतिनिधींना वेळ देत नव्हते, असा आरोप खोटा असल्याचेही शिवसेनेचे

म्हणणे आहे. शेतकरी संकटात असतानाही राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याचे अश्रू पुसण्यासाठी वेळ नव्हता. त्यांनी शिंदे गटाच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला शासकीय काम सोडून हजेरी लावण्यातच धन्यता मानली.

बातम्या आणखी आहेत...