आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सरकारने आधी वीजबिल माफ करण्यात तयारी दर्शवली होती. परंतु अदानी शरद पवारांच्या घरी येऊन गेल्यावर सरकारने वीजबिल माफीस नकार दिला अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. मात्र “या गोष्टीत नाकाएवढंही तथ्य नाही. केवळ बातम्या होण्यासाठी काही जण शरद पवारांवर टीका करतात” अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंचे नाव घेता केली आहे.
अजित पवार अमरावतीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर टीका केली. “शरद पवार साहेबांचा या राज्याशी 60 वर्षांपासून संबंध आहे. त्यामुळे पवार साहेब असं कधीच करू शकत नाहीत. काही लोक बोलत असताना अशा मान्यवरांची नावे घेतात, की त्यातून बातम्या होतात.” असे अजित पवार म्हणाले.
काय म्हणाले होते राज ठाकरे ?
वाढीव वीजबिलांविरोधात सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलने केली. महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल झाले. आम्ही राज्य सरकार आणि राज्यपालांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर शरद पवारांशी बोलल्यानंतर त्यांनी वीज कंपन्यांच्या नावाने पत्रं मागवली, आम्ही पत्रं पाठवली तर पुढच्याच दिवशी अदानी पवार साहेबांच्या घरी येऊन गेले. त्यानंतर सरकारचीही भूमिका आली की नागरिकांना वीजबील भरावंच लागेल. सर्व वीज कंपन्यांना पाठीशी घालण्याचे काम सरकार करतंय. असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.