आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांना 'ते' वक्तव्य भोवलं:अमरावतीत भाजपकर्ते आक्रमक, पवार यांच्या राजीनाम्याची केली मागणी

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पार्टीच्या मोर्शी तालुका शाखेच्यावतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

येथील तहसील कार्यालयाजवळ हे आंदोलन करण्यात आले. भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, महामंत्री प्रशांत शेगोकर, तालुका अध्यक्ष प्रवीण राऊत व शहराध्यक्ष सुनील ढोले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले गेले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षक, नव्हते अशा प्रकारचे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.

त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. एवढेच नव्हे तर आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या फोटोला चपलांचा हार घालून प्रतीमेची अवमानना केली. आंदोलनकर्त्यांच्या मते पवार यांनी हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्यास योग्य नाहीत. त्यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आंदोलनात निवेदिता चौधरी व प्रशांत शेगोकर या जिल्हास्तरीय नेत्यांसह स्थानिक पदाधिकारी ज्योतीप्रसाद मालवीय, विलास आघाडे, शरद काटोलकर, प्रशांत राऊत, शरद मोहोड, सुनील कडू, शंकर उईके, हर्षल चौधरी, विलास वानखडे, मनोहर शेंडे, सुशील धोटे, राजेश खाटगडे, युवा मोर्चाचे विजय टेकाळे, निलेश शिरभाते, सागर माहोरे, कैलाश कनेर, अनिल शिंगारे, रुपेश खाटगडे, बाबाराव जाधव, सचिन चौधरी, सचिन राजगुरे, विवेक चोपडे, शेखर गावंडे, सोशल मीडिया प्रमुख रवी मोरे यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...