आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहे. त्या अनुषंगाने शहरात भाजपने बसस्थानक चौकात निषेध व घोषणाबाजी करत पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. येथील बस स्थानक चौकात आज २ जानेवारी रोजी शहर व तालुका भाजपच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत बोलतांना ते धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक होते. असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा भाजपच्या वतीने निषेध केला. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी अजितदादा मुर्दाबादच्या घोषणा देत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
या आंदोलनात भाजप नेते डॉ.गणेश मांटे, तालुकाध्यक्ष विठोबा मुंडे, शहराध्यक्ष प्रवीण धन्नावत, राजेश भूतडा, एकनाथ काकड, यादवराव भालेराव, निशिकांत भावसार, विकास डोईफोडे, अमोल काकड, संजय इलग, श्रीराम बर्डे, प्रमोद धाराशिवकर, अनिल चित्ते, गबाजी कुटे यांच्यासह असंख्य भाजपा पदाधिकारी सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.