आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीमध्ये शेतकऱ्यांचा ‘आक्रोश’ मोर्चा:शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकरिता शिवसेना आक्रमक; तहसील कार्यालयावर दिली धडक

अमरावती8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चांदूर बाजार येथील तहसील कार्यालयावर सोमवारी (दि. 21) आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

या वेळी चांदूर बाजार तालुका ओला दुष्काळ जाहीर करा, संपूर्ण तालुक्यात सरसकट पिक विमा लागू करावा, अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत द्यावी, कृषी पंपाला दिवसाला आठ तास वीजपुरवठा करावा, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्रतीक्षा यादी तात्काळ मंजुरात देण्यात यावी, शहरी व ग्रामीण घरकुल योजनेच्या पैशात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने शहरीप्रमाणे ग्रामीण भागालाही पैसे देण्यात यावे, घरकुलासाठी पी आर कार्डची अट रद्द करावी, धडक सिंचन विहीर योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ देवून त्यावर अनुदानावरील सौर ऊर्जेचे कृषी पंप द्यावे, सोयाबीनला प्रति क्विंटल 10 हजार रुपये, कापसाला प्रति क्विंटल 12 हजार रुपये स्थिर भाव द्यावा, उज्वला गॅस योजनेंतर्गत केंद्र सरकारने मोफत दिलेले गॅस सिलेंडर बीपीएल कार्डधारकांना मोफत गॅस भरून देण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्यात.

आंदोलनामध्ये अचलपूर विधानसभा संघटक ओमप्रकाश दीक्षित, तालुका प्रमुख आशिष वाटाणे, शहर प्रमुख शैलेश पांडे, उप तालुका प्रमुख रोशन जयसिंगपूरे, अनिल सायंदे, विजुभाऊ घुलशे, वाहतूक सेना प्रमुख नरेश तायवाडे, युवा सेना तालुका प्रमुख पवन राऊत, युवा सेना शहर प्रमुख शुभम सपाटे, माजी तालुका प्रमुख देवेंद्र औतकर, छोटू ठाकरे, सागर माकोडे, तसलीम भाई, बाळासाहेब झोलेकर, चंदन पवार, विक्रम फुकट, किशोर राठोड, भीमराव डांगे, तनय बिजवे, आशिष देवताळे, जितेंद्र वाट, संजय शिंदे, विजय भगत, सोयल बारी, नरेंद्र ठाकरे, संजय खेरडे, अमोल वाघमारे, अभिजित गंगालवार, सौरव सावरकर, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष अक्षय पांडे, तालुकाध्यक्ष प्रतीक काटोलकर, कमलेश अंबाडकर, अनिल वानखडे, कुशल भेटाळू, महेंद्र पारिसे, शेख अश्रफ शेख इस्माईल, रवींद्र वानखडे, मो. नावेद शहा, नसीम खान, संतोष गडलिंग, रामराव राठोड आदींसह मोठ्या संख्येने युवा सैनिक, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...